पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर गोळीबार; एक जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 05:34 PM2019-10-27T17:34:06+5:302019-10-27T17:35:49+5:30
या गोळीबारात एक भारतीय जवान जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे.
जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मिरातील राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने आज पहाटे युद्धबंदीचे उल्लंघन केले. आज पहाटे भारतीय तळांवर गोळीबार देखील करण्यात आला. त्याला भारतीय सैन्याने प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच सुंदरबानी सेक्टर परिसरात देखील पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक भारतीय जवान जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे.
Jammu and Kashmir: Pakistan violated ceasefire in Rajouri and fired at Indian positions in the morning today. Indian troops retaliated effectively.
— ANI (@ANI) October 27, 2019
दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय लष्काराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मोदी आज दुपारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये दाखल झाले होते. कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये आले. जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मोदी त्यांच्यासोबत काही वेळ घालवला. राजौरी सेक्टर येथून परताना मोदी यांनी पठाणकोट एअरफोर्स स्टेशनला देखील भेट दिली. या ठिकाणी नव्याने हवाई दलात समाविष्ट केलेले अपाचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे.
Jammu and Kashmir: Prime Minister Narendra Modi celebrated #Diwali in Rajouri district with Army personnel, today. pic.twitter.com/PyQZeQO2L1
— ANI (@ANI) October 27, 2019
Punjab: Prime Minister Narendra Modi, while returning from Rajouri (J&K), also visited the Pathankot Air Force station - the home base of newly-inducted Apache attack helicopters (helicopters seen in the pictures). pic.twitter.com/E3vbC7es6X
— ANI (@ANI) October 27, 2019