पाकिस्तानी बोटीला केले उध्वस्त; भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएसची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 05:27 PM2019-03-27T17:27:06+5:302019-03-27T17:28:28+5:30
कारवाई भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने मिळून केली आहे.
गांधीनगर - अमली पदार्थ घेऊन भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला उद्धवस्त करण्यात यश आले आहे. या बोटीत अंदाजे ५०० कोटीचे १०० किलो हेरॉईन असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी ९ तस्करांना अटक करण्यात आली असून ही कारवाई भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने मिळून केली आहे.
पोरबंदरजवळील भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानचीअमली पदार्थ असलेली बोट घुसली होती. संशय आल्यानंतर तटरक्षक दल आणि एटीएसने कारवाई करत बोटीला घेराव घातला. यानंतर बोटीतील ९ तस्करांना ताब्यात घेण्यात आले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील हेरॉईनच्या पिशव्या जप्त केल्या आहेत. पाकिस्तानातून आणले जात असलेले हे अमली पदार्थ देशभरात पाठविणार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.
Indian Coast Guard along-with ATS Officers has apprehended 9 Iranian nationals from a boat& seized approx 100 kg contraband Heroin, off Gujarat coast.Approx value of the contraband is estimated to be Rs 500 Crores. The crew of the boat had set the boat ablaze to destroy evidence. pic.twitter.com/l95Mg0nCZl
— ANI (@ANI) March 27, 2019