पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'च्या प्रमुखपदी ले. जनरल असीम मुनीर यांची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 16:49 IST2018-10-11T16:49:25+5:302018-10-11T16:49:58+5:30
मुनीर हे याआधी लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. नुकतीच त्यांना लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील आर्मी प्रमोशन बोर्डाने लेफ्टनंट जनरलपदी पदोन्नती देण्यात आली होती.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'च्या प्रमुखपदी ले. जनरल असीम मुनीर यांची वर्णी
इस्लामाबाद - भारताविरोधीत कारवायात करण्यात पुढे असणाऱ्या 'आयएसआय' या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विभागाकडून ही माहिती देण्यात आली. मुनीर हे याआधी लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. नुकतीच त्यांना लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील आर्मी प्रमोशन बोर्डाने लेफ्टनंट जनरलपदी पदोन्नती देण्यात आली होती.
मुनीर लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांची जागा घेणार आहेत. मुख्तार डिसेंबर 2016 पासून आयएसआयचे प्रमुख होते. पाकिस्तान लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय धोरण आणि निर्णयांमध्ये 'आयएसआय'ची भूमिका नेहमी महत्वपूर्ण मानली जाते. आतापर्यंत भारतात झालेल्या अनेक आतंकवादी हल्ल्यांमध्ये आयएसआयचा प्रमुख हात असल्याचे उघड झाले आहे. कश्मीरसह भारताच्या अन्य भागांमध्ये अस्थितरता, अशांतता कशी निर्माण करता येईल यासाठी 'आयएसआय' प्रयत्नशील असते.