पाकच्या आदिल शेखनं हरशिमरनला केलं ब्लॅकमेल; ३६३ कोटींचे हेरॉइन प्रकरणी खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 05:55 AM2023-02-23T05:55:21+5:302023-02-23T05:55:33+5:30

हरशिमरनला मुंबईत कोणीच ओळखत नसल्याने त्याने मुंद्रा बंदरातील कस्टम क्लिअरिंग एजंट महेंद्र राठोड याच्याशी संपर्क साधला.

Pakistan's Adil Sheikh blackmailed Harshimaran; 363 crore heroin case disclosure | पाकच्या आदिल शेखनं हरशिमरनला केलं ब्लॅकमेल; ३६३ कोटींचे हेरॉइन प्रकरणी खुलासा

पाकच्या आदिल शेखनं हरशिमरनला केलं ब्लॅकमेल; ३६३ कोटींचे हेरॉइन प्रकरणी खुलासा

googlenewsNext

आशिष सिंग

मुंबई - गेल्या वर्षी जेएनपीटी बंदरात आलेल्या ३६३ कोटी रुपये किमतीचा हेरॉइनचा साठा ताब्यात घेण्यास आयातदार हरशिमरन सेठी याने नकार दिल्यानंतर पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेचा ड्रग सप्लायर आदिल शेख आणि जर्मनीतील मोनू सिंह ऊर्फ मनी हे तो साठा दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी हरशिमरनला ब्लॅकमेल करीत होते, असे तपासात उघडकीस आले आहे. 

हरशिमरनने चौकशीत सांगितल्यानुसार व्हिएतनाम, ग्रीस, चीन आणि पाकिस्तान येथून तो विविध प्रकारच्या मालाची आयात करतो. याचदरम्यान त्याची अटारी सीमेवर आदिल शेखशी ओळख झाली. आदिल हरशिमरनला पाकिस्तानातून ड्रायफ्रूटचा पुरवठा करायचा. दोघांमध्ये उधारीवर व्यवसाय चालायचा. मात्र कालांतराने हरशिमरनचे व्यवसायात नुकसान झाल्याने तो आदिलचे १ कोटी ३० लाख रुपये देणे लागत होता. रकमेच्या वसुलीसाठी हरशिमरन आणि त्याच्या कुटुंबीयांना आयएसआयमार्फत धमकीचे फोन येऊ लागले. 
आदिलच्या हस्तकांकरवी खात्मा केला जाईल, असे त्याला धमकावले जात होते. घाबरलेला हरशिमरन २०२० साली गुजरातमधील गांधीग्राम येथे राहावयास गेला. जयपूरमध्ये व्यवसायात जमू लागलेला असतानाच हरशिमरनला आदिल शेखचा फोन आला. उधारीचे १ कोटी ३० लाख रुपये माफ केल्याचे सांगत अफगाणिस्तानातून आलेला संगमरवरी फरशांचा साठा ताब्यात घेऊन दिल्लीला पोहोचवण्याची गळ आदिलने हरशिमरनला घातली. ती मान्य करून हरशिमरन दिल्लीतील घरी परतला. 

काही महिन्यानंतर लुधियानातून चारजण हरशिमरनला भेटायला आले. याच चौघांवर ड्रग तस्कर मोनू सिंहने हेरॉइनचा साठा दिल्लीहून पंजाबमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी सोपवली होती. या चौघांनी  हरशिमरनला २१ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यातील २० लाख रुपये अफगाणिस्तानातील हा कंटेनर चालान बनवून जेएनपीटी बंदरातून ताब्यात घेण्याचे तसेच एक लाख रुपये मुंबई ते दिल्लीपर्यंतच्या वाहतुकीसाठी होते. कंटेनर दिल्लीत पोहोचल्यावर तो पंजाबला नेण्याची त्यांची योजना होती. चौघांना नंतर पंजाब पोलिसांनी अटक केली. 

हरशिमरनला मुंबईत कोणीच ओळखत नसल्याने त्याने मुंद्रा बंदरातील कस्टम क्लिअरिंग एजंट महेंद्र राठोड याच्याशी संपर्क साधला.  राठोडने दुसरा एजंट सागर कांबळे याला गाठले. तपशिलात गेल्यावर हरशिमरनच्या लक्षात आले की बंदरात आलेला कंटेनर अफगाणिस्तानातून नसून पाकिस्तानातून पाठवण्यात आला आहे. त्यावरील २८० टक्के ड्युटी भरल्यावरच तो आपल्या ताब्यात दिला जाईल. त्यामुळे हरशिमरनने तो ताब्यात घेण्यास नकार दिला. या प्रकाराने संतापलेल्या आदिल शेख आणि मोनू सिंह यांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली. हा कंटेनर ताब्यात घेऊन दिल्लीपर्यंत पोहोचवला नाही तर त्या कंटेनरमध्ये हेरॉइन असून, तो हरशिमरन हाच त्याचा आयातदार आहे आणि तो दिल्ली तसेच पंजाबमध्ये पाठवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती तपास यंत्रणांना देऊ, असा दम ते देत राहिले. यादरम्याम सात महिने कंटेनर बंदरातच पडून राहिला. काही दिवसांनी त्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आणि छापासत्र घडले.

Web Title: Pakistan's Adil Sheikh blackmailed Harshimaran; 363 crore heroin case disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.