कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 05:02 PM2020-07-22T17:02:03+5:302020-07-22T17:12:18+5:30

जाधव भारताच्या मदतीशिवाय वकिली करू शकत नाहीत, असेही याचिकेत म्हटले आहे. तसेच जाधव यांनी फेरविचार याचिका नाकारली असल्याचेही पाकिस्तान सरकारने न्यायालयात सांगितले आहे.

Pakistan's new idea in Kulbhushan Jadhav case; Demand for counsel from the High Court | कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

Next
ठळक मुद्देआयसीजेने पाकिस्तानला या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले आणि जाधव यांना भारताला कौन्सिलर ऍक्सेस देण्यास सांगितले होते. एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तान लष्कराच्या कोर्टाने जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

कुलभूषण जाधव यांना वकील देण्याच्या बाबतीत पाकिस्तान सरकारने आता इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पाकिस्तान सरकारने आयसीजेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी वकील नेमण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, जाधव भारताच्या मदतीशिवाय वकिली करू शकत नाहीत, असेही याचिकेत म्हटले आहे. तसेच जाधव यांनी फेरविचार याचिका नाकारली असल्याचेही पाकिस्तान सरकारने न्यायालयात सांगितले आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव हे पाकिस्तान तुरूंगात कैद आहेत. एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तान लष्कराच्या कोर्टाने जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तानच्या या निर्णयाच्या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली, जेथे सध्या हा खटला बराच काळ चालू आहे.

आयसीजेने पाकिस्तानला या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले आणि जाधव यांना भारताला कौन्सिलर ऍक्सेस देण्यास सांगितले होते. यानंतर पाकिस्तान कोर्टाची दिशाभूल करणारी युक्ती सतत अवलंबत आहे. अलीकडेच जाधव यांनी पाकिस्तानात भारतीय उच्चायोगाच्या दोन अधिकाऱ्यांची भेट घेतली. परंतु ही बैठक पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावर, भारताने जाधव यांच्याशी उघडपणे बोलण्याची परवानगी नसल्यामुळे हा कौन्सिलर ऍक्सेस अर्थपूर्ण नव्हता. यापूर्वी २०१७ मध्ये जाधव यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.


आता पाकिस्तानने पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीशिवाय कुलभूषण जाधव यांना कौंसिलर ऍक्सेस देण्याची ऑफर दिली. दरम्यान, पाक सरकार उच्च न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की, कुलभूषण जाधव यांनी त्यांच्या शिक्षेविरोधात फेरविचार याचिकेची मागणी नाकारली आहे. तसेच जाधव हे भारताच्या मदतीशिवाय वकिली करू शकत नाहीत, असे याचिकेत म्हटले आहे. जाधव प्रकरणात पाकिस्तानने सातत्याने कौन्सिलर ऍक्सेस देणे टाळले आहे. आता पाकिस्तानने कौन्सिलर ऍक्सेस देण्यास सहमती दर्शविली आहे, म्हणून इस्लामाबाद उच्च न्यायालयात नवीन युक्ती लढवली आहे. भारताला आयसीजे कौन्सुलर ऍक्सेससाठी परवानगी  दिली होती, परंतु अद्यापपर्यंत पाकिस्तानने कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवेश दिलेला नाही.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

Web Title: Pakistan's new idea in Kulbhushan Jadhav case; Demand for counsel from the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.