भयंकर! नाराज होऊन 'तिने' घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; पतीसमोरच सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 05:16 PM2022-09-27T17:16:43+5:302022-09-27T17:37:25+5:30
पीडित महिला सासरच्यांशी भांडण झाल्यावर पायीच माहेरी निघाली होती. सायंकाळी तिला सासरच्या घरी नेण्यासाठी लोक तिची समजूत घालण्यासाठी आले, मात्र महिलेनं सासरी जाण्यास नकार दिला.
झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पलामू येथे 22 वर्षीय विवाहितेवर सहा जणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेच्या पतीने पोलिसांना याबाबत माहिती असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाराज होऊन महिलेने घर सोडलं पण नराधमांनी गाठलं आणि पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सासरच्यांशी भांडण झाल्यावर पायीच माहेरी निघाली होती. सायंकाळी तिला सासरच्या घरी नेण्यासाठी लोक तिची समजूत घालण्यासाठी आले, मात्र महिलेनं सासरी जाण्यास नकार दिला. पीडितेच्या पतीने आपल्यासोबत एका नातेवाईकालाही घेतलं होतं. दोघेही महिलेची समजूत काढत होते. मात्र याच दरम्यान सहा जणांनी त्यांचे मोबाईल आणि बाईक हिसकावून तिघांनाही मारहाण केली.
पतीसमोरच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याच दरम्यान पीडितेच्या पतीला बांधून ठेवलं होतं. यानंतर आरोपींनी पीडितेच्या पतीला तिथेच सोडलं आणि नंतर महिलेसह अन्य व्यक्तीला बाईकवरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ लागले. यावेळी बाईक आणि एका कारची धडक झाली. कार पाहून महिलेने आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून ग्रामस्थ जमा झाले. गावकऱ्यांनी आरोपींना पकडून बेदम मारहाण केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे,