आर्यन खान प्रकरणात २५ कोटींच्या 'तोडपाणी'चं पालघर कनेक्शन; प्रभाकर साईल डीपीचा दुरूपयोग केल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 08:54 PM2021-10-26T20:54:13+5:302021-10-26T20:55:45+5:30

Twist In Aryan Khan case : मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर एनसीबीने केलेली कारवाई सध्या देशभर गाजत आहे.

Palghar connection of Rs 25 crore settlement in Aryan Khan case; Hainik Bafna claims that Prabhakar Sail DP was abused | आर्यन खान प्रकरणात २५ कोटींच्या 'तोडपाणी'चं पालघर कनेक्शन; प्रभाकर साईल डीपीचा दुरूपयोग केल्याचा दावा

आर्यन खान प्रकरणात २५ कोटींच्या 'तोडपाणी'चं पालघर कनेक्शन; प्रभाकर साईल डीपीचा दुरूपयोग केल्याचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्देह्या संभाषणादरम्यान 25 कोटीची मागणी करून 18 कोटींची डील फिक्स करून त्यातील 8 वानखेडे यांना देऊन बाकी 10 आपण वाटून घेऊ असे संभाषण गोसावी आणि सॅम दरम्यान झाल्याचा दावा प्रभाकरने केला होता.

हितेंन नाईक

पालघर - मुंबई क्रुज ड्रग प्रकरणात  साक्षीदार असलेल्या किरण गोसावी ह्याचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल ह्यांनी आर्यन खान च्या सुटके साठी मागितलेल्या 25 कोटीतील 38 लाख आपण ज्या सॅम डिसुझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून त्याचा फोटो एका चॅनलमध्ये दाखविला होता.तो फोटो असणारी व्यक्ती ही पालघरमधील हेनिक बाफना असून प्रभाकर साईल ह्यांनी आपल्या प्रोफाइल फोटो दुरुपयोग केल्याची आणि ह्या प्रकरणाचा आपला कुठलाही संबंध नसल्याने प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस अधिक्षकाकडे केली आहे.

मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर एनसीबीने केलेली कारवाई सध्या देशभर गाजत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून या प्रकरणात एनसीबीचे साक्षीदार असलेले किरण गोसावी यांचे खाजगी बॉडीगार्ड असलेल्या प्रभाकर साईल यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि साक्षीदार असलेले किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका वृत्त वाहिनीवर प्रभाकर साईल यांनी दिलेल्या माहितीदरम्यान क्रुझवरील कारवाईनंतर बाहेर आल्यावर किरण गोसावीला सॅम नामक व्यक्तीचा फोन आला. ह्या संभाषणादरम्यान 25 कोटीची मागणी करून 18 कोटींची डील फिक्स करून त्यातील 8 वानखेडे यांना देऊन बाकी 10 आपण वाटून घेऊ असे संभाषण गोसावी आणि सॅम दरम्यान झाल्याचा दावा प्रभाकरने केला होता. ह्याच सॅमने माझ्या मार्फत चर्चगेट जवळील एका हॉटेल जवळ 38 लाख रुपये घेतल्याची माहिती दिली.

प्रभाकरने आपल्या मोबाईलमध्ये दाखवलेला सॅम नामक व्यक्तीचा फोटो हा पालघरमधील एक व्यापारी हेनिक बाफना ह्यांचा असून मी प्रभाकर साईलला दोन महिन्यापूर्वी व्यवसायानिमित्त भेटलो होतो. मात्र माझा त्याच्याशी कुठलाही व्यवहार झाला नसल्याबाबत तक्रार अर्ज पोलीस अधिक्षकाकडे दिला आहे. माझा प्रोफाइलवरील फोटो आणि माझ्या मोबाईल नंबरचा आधार घेत माझे सॅम नाव सांगून मला 38 लाख रुपये दिल्याची माहिती प्रसारित करून प्रभाकर साईल माझी बदनामी करीत असल्याचे बाफना ह्यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. माझी बदनामी करणाऱ्या प्रभाकरवर कडक कारवाईची मागणी ही त्या तक्रार अर्जात करण्यात आली आहे.आरोपी किरण गोसावी हा पालघर जिल्ह्यातील मनोर येथील रहिवासी असून त्याचे पालघरमध्ये अनेक वेळा फेऱ्या मारल्याची माहिती पुढे येत असून त्याचा अनेक लोकांशी व्यवहार झाल्याची चर्चा आहे. 

 

Web Title: Palghar connection of Rs 25 crore settlement in Aryan Khan case; Hainik Bafna claims that Prabhakar Sail DP was abused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.