Palghar Mob Lynching : साधू हत्या खटल्यात पीडितांची बाजू लढवणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 09:01 PM2020-05-14T21:01:01+5:302020-05-14T21:03:36+5:30

Palghar Mob Lynching : त्रिवेदी हे एम एच 04 एच एम 1704 क्रमांकाच्या कारने येत असताना कारवरील ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या कडेला उलटली.

Palghar Mob Lynching: Lawyer fighting sadhu murder case died in road accident pda | Palghar Mob Lynching : साधू हत्या खटल्यात पीडितांची बाजू लढवणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू

Palghar Mob Lynching : साधू हत्या खटल्यात पीडितांची बाजू लढवणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू

Next
ठळक मुद्देत्यांच्या सहकारी प्रीती त्रिवेदी (२८) यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जखमी झाल्या आहेत. दोघांना कासा पोलीसानी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.साधूंच्या पक्षात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी येत असताना सकाळी 10 च्या सुमारास हा अपघात झाला.

पालघर - भाईंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी (३२) यांचा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवणच्या खिंडीत अपघातीमृत्यू झाला आहे. ते काल डहाणू न्यायालयात जमावाच्या हल्ल्यात ठार झालेल्या साधूंच्या पक्षात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी येत असताना सकाळी 10 च्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्यासोबत प्रवास करणारी त्यांची सहकारी प्रीती त्रिवेदी गंभीर जखमी झालेली आहे. त्रिवेदी हे एम एच 04 एच एम 1704 क्रमांकाच्या कारने येत असताना कारवरील ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या कडेला उलटली.


वॅग्नर कार मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जात असताना मेंढवन येथे तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाल्याने गाडी घसरत पुढे गेल्याने वाहनचालक वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा गाडीत चेंगरून त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर त्यांच्या सहकारी प्रीती त्रिवेदी (२८) यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जखमी झाल्या आहेत. दोघांना कासा पोलीसानी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी प्रीती यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढे ठाणे कळवा येथील रुग्णालयात पुढील उपचारसाठी पाठविण्यात आले आहे. तर दिग्विजय यांचा मृत्यू झाला. मृत झालेली व्यक्ती बहुजन विकास आघाडी (मीरा भाईंदर )चे विधी सेलचे जिल्हा अध्यक्ष असून वकील आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

 

'शर्म करो गहलोत', सामूहिक बलात्कार प्रकरणात हॅशटॅग ट्रेंड करत विरोधकांनी सीएमना घेरलं

 

ब्रिटन हायकोर्टाचा मल्ल्याला जबरदस्त दणका; संधी संपली, २८ दिवसांत भारतात येण्याची शक्यता

 

Coronavirus : पोलीस कोठडीतील चार आरोपींना कोरोनाची लागण

Web Title: Palghar Mob Lynching: Lawyer fighting sadhu murder case died in road accident pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.