Palghar Mob Lynching : दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, तपास सीआयडीकडे वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 02:41 PM2020-04-20T14:41:06+5:302020-04-20T14:45:53+5:30
Palghar Mob Lynching : निलंबित करण्यात आल्याची घोषणा कोकण पोलीस महासंचालकनी केली.
पालघर - डहाणू जिल्यातील गडचिंचले परिसरात दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकास गावकऱ्यांनी बेदम मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केली. या तिहेरी हत्येप्रकरणी अपयशी ठरलेल्या कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काले आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे यांना दोषी ठरवित निलंबित करण्यात आल्याची घोषणा कोकण पोलीस महासंचालकांनी केली. तसेच तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.
Palghar Mob Lynching: पालघर ‘मॉब लिंचिंग’चा प्रकार दुर्दैवी पण हे पहिल्यांदाच घडलं असं नाही, तर...
नराधमांची भूमी...लाज वाटली पाहिजे...!! पालघरच्या घटनेवर सुमीत राघवनची जळजळीत प्रतिक्रिया
Palghar Mob Lynching: बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात संतांची हत्या, कल्पनाही करवत नाही; ऑलिम्पिकपटू योगेश्वर दत्तची खंत
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या गुरुवारी रात्री घडली होती. समजून सांगण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली. त्यापैकी नऊजण अल्पवयीन असून त्यांना बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजते.
Palghar Mob Lynching: संतांची निर्घृण हत्या; भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण म्हणतो...
Palghar Mob Lynching: ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका
हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (३०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे हा प्रकार घडला. मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे कारने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गडचिंचले येथे रोखून चोर समजून २५० ते ३०० च्या जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयती, कुऱ्हाडी आणि दगडांच्या साहाय्याने हल्ला केला होता. येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती पोलिसांना दिली. तिथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, या प्रकरणावरून आता राजकीय आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत.