पालघरमध्ये रिक्षाचालकाने घेतले जाळून, निवासी उपजिल्हाधिकारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 12:23 AM2019-10-04T00:23:11+5:302019-10-04T00:24:24+5:30
नालासोपारा येथील बिल्डरने आपली फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या गणेश भोर (५७, रा. नालासोपारा) या रिक्षाचालकाने कायदेशीर प्रक्रियेला कंटाळून जाळून घेतले.
पालघर : नालासोपारा येथील बिल्डरने आपली फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या गणेश भोर (५७, रा. नालासोपारा) या रिक्षाचालकाने कायदेशीर प्रक्रि येला कंटाळून जाळून घेतले. या घटनेत निवासी उपजिल्हाधिकारी जखमी झाले आहेत. रिक्षाचालक ७० टक्के भाजला असून त्याला ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या गंभीर घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली.
नालासोपारा येथील एक खाजगी बिल्डर चांद मोहम्मद शेख आणि इतर यांकडून गणेश भोर यांनी सदनिका खरेदी केली होती. या सदनिकेच्या मोबदल्यात भोर यांनी ८ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम भरली होती. बिल्डरने पैसे घेतल्यानंतर सदनिकेचा ताबा देणे अपेक्षित असतांना त्याने ती सदनिका परस्पर दुसऱ्याला विकली. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी भोर यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यासाठी अनेक फेºया मारल्या. नालासोपारा पोलीस ठाण्यात आॅगस्ट २०१८ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या व्यवहारातील ६ लाख २५ हजार रुपये डिमांड ड्राफ्टच्या साहाय्याने भोर यांना मिळाले होते. उर्वरित २ लाख ८ हजाराची रक्कम बिल्डरने नालासोपारा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक नरवडे यांच्याकडे २६ नोव्हेंबर २०१८ रोजी दिल्यानंतर ती रक्कम देण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिल्याची तक्र ार भोर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मला माझी रक्कम न मिळाल्यास मी मंत्रालयासमोर आत्मदहन करेन, असे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात दिले होते.
मंत्रालयातून पालघर पोलीस अधीक्षकांना आदेश आल्यानंतर २ लाख ८ हजाराची रोख रक्कम मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अॅथॉरिटी पॉवर असलेल्या अधिकाºयाकडूनच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच ही रक्कम मिळते. मात्र या संदर्भात वसई प्रांताधिकाºयांनी आपण सक्षम अधिकारी नसल्याचे सांगत त्यांना उप जिल्हाधिकारी कार्यालयातुन परत पाठवले होते.
गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासूनच तक्रारदार भोर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव यांची भेट घेत सर्व वृत्तांत सांगितला.
हक्काचे पैसेही मिळत नसल्याने टोकाचा निर्णय
या प्रकरणातील मूळ कागदपत्रांची मागणी त्यांनी केल्यानंतर भोर यांनी घरी फोन करून मूळ कागदपत्रे आणण्यास सांगितली. दुपारी सव्वा चारच्या सुमारास तक्रारदार भोर हे निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या कार्यालयात गेले. कार्यालयात झालेल्या चर्चेनंतर त्यांनी स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
मेहनतीच्या पैशातून घराचे स्वप्न पाहणा-या गरीब रिक्षावाल्याला हक्काचे पैसे मिळविण्यासाठी वर्षभरापासून पोलीस ठाणे, मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशा खेपा माराव्या लागल्या. त्यातूनच हा आत्मघाती निर्णय पतीला घ्यावा लागल्याचे त्याच्या पत्नीने ‘लोकमत’ला सांगितले.