पालघर साधू हत्याकांड प्रकरण : तत्कालीन कासा पोलीस अधिकारी यांच्यासह तिघांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 09:36 PM2020-08-31T21:36:33+5:302020-08-31T21:47:00+5:30

पोलीस अधिकारी काळे बडतर्फ

Palghar sadhu murder case: Action against three including the then Casa police officer in mob lynching | पालघर साधू हत्याकांड प्रकरण : तत्कालीन कासा पोलीस अधिकारी यांच्यासह तिघांवर कारवाई

पालघर साधू हत्याकांड प्रकरण : तत्कालीन कासा पोलीस अधिकारी यांच्यासह तिघांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देअन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती  घेण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ह्यांनी दिले आहेत.पोलिस उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवी साळुंखे व दोन पोलीस हवालदार नरेश धोडी व संतोष मुकणे यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते.  

पालघर/कासा - डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या तिहेरी  हत्याकांड प्रकरणी कासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद काळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती घेण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ह्यांनी दिले आहेत.

    

पालघर साधू हत्याकांड प्रकरण : सुप्रीम कोर्टात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

 

16 एप्रिल रोजी डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील गडचिंचले येथील वनविभागाच्या चेकनाक्या जवळ एका इको कार मधून आलेल्या सुशीलगिरी महाराज(वय 35 वर्ष),चिकने महाराज कल्पवृक्ष गिरी(वय70 वर्ष) आणि त्यांच्या कार चा चालक निलेश तेलगडे(वय 30 वर्ष) ह्यांची जमावाने हत्या केली होती.ह्या प्रकरणी पोलिसांवर "स्लॅक सुपार्व्हिजन"चा ठपका ठेवीत तत्कालीन पोलीस अधीक्षक ह्यांना सक्तीच्या रजेवर पाठवीत नंतर त्यांची बदली करण्यात आली होती.आज कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी कासा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांना सेवेतून बडतर्फ केले तर सहाय्यक पोलिस उप निरीक्षक रवी साळुंखे व वाहन चालक कॉन्स्टेबल नरेश धोडी यांनी सक्तीची सेवानिवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

पोलिस उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवी साळुंखे व दोन पोलीस हवालदार नरेश धोडी व संतोष मुकणे यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते.  कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या 35 पोलिस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती. गुन्हा अन्वेषण (सीआयडी) विभागाकडून ह्या  गुन्ह्याचा तपास केला जात असून गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल केले आहे व याची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होत आहे. दरम्यान याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येत आहे.

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट

 

संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती 

 

जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता

 

Coronavirus : सहा दिवसांत दुसरा पोलीस ठरला कोरोनाचा बळी; गमावले तीन योद्धे

 

Mahad Building Collapse : महाड इमारत दुर्घटनेतील 4 आरोपी अद्याप फरार, विकसकाची माणगाव न्यायालयात धाव

 

 

Web Title: Palghar sadhu murder case: Action against three including the then Casa police officer in mob lynching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.