तळीरामांनो सावधान! थर्टी फर्स्टच्या मोक्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह करणारे पोलिसांच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:55 PM2018-12-27T15:55:53+5:302018-12-27T15:58:45+5:30
मद्यपान करून गाडी चालवताना सापडेल त्याच्यावर मोटार वाहन कायदा 185 नुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित तळीरामांचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो अथवा दंडात्मक कारवाई अन्यथा दोन्ही कारवाया केल्या जातील असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई - सध्या सगळीकडे सेलिब्रेशनचा मूड असून ख्रिसमसनंतर थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन जवळ आलं आहे. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन म्हणजे तळीरामांसाठी जणू पर्वणीच असते. काही तळीरामांनी तर 25 तारखेपासूनच पार्ट्यांचे बेत आखायला सुरुवात केली आहे. या सेलिब्रशनमध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून अपघात करून बाधा आणली जाते. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे धोकादायक असल्याने त्याची वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच पोलीस तळीरामांविरोधात थर्टी फर्स्ट फिवर उतरेपर्यंत शहरात कठोर कारवाईचा बडगा उचलणार आहेत.
शहरात उत्साहाचे वातावरण असल्याने त्यात तळीरामांमुळे बाधा येऊ नये म्हणून वाहतूक पोलीस सक्रिय झाले आहेत. वादविवाद, अपघाताच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी तळीरामांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. इतर दिवसांच्या तुलनेत 25 ते 31 डिसेंबरदरम्यान आणखी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करून तळीरामांची झिंग उतरविण्यात येणार आहे. मद्यपान करून गाडी चालवताना सापडेल त्याच्यावर मोटार वाहन कायदा 185 नुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित तळीरामांचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो अथवा दंडात्मक कारवाई अन्यथा दोन्ही कारवाया केल्या जातील असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
25 ते 31 डिसेंबरदरम्यान आणखी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करून तळीरामांची झिंग उतरविण्यात येणार आहे. मद्यपान करून गाडी चालवताना सापडेल त्याच्यावर मोटार वाहन कायदा 185 नुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 27, 2018