पंचायतीने सुनावली "तालिबानी" शिक्षा, जोडप्याला आधी मारहाण नंतर विवस्त्र करत गावभर काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 01:02 PM2021-09-15T13:02:33+5:302021-09-15T13:05:43+5:30

लग्न झालेल्या महिलेचे तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा गावकऱ्यांचा आरोप

Panchayat orders Talibani punishment, couple beaten by mob in Forbesganj bihar | पंचायतीने सुनावली "तालिबानी" शिक्षा, जोडप्याला आधी मारहाण नंतर विवस्त्र करत गावभर काढली धिंड

पंचायतीने सुनावली "तालिबानी" शिक्षा, जोडप्याला आधी मारहाण नंतर विवस्त्र करत गावभर काढली धिंड

Next

फारबिसगंज:बिहारमधून पुन्हा एकदा लाजिरवाणी घटना समोर आली आहे. फारबिसगंजमध्ये एका प्रेमी युगूलाला मारहाण करत नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. त्यांच्यावर गावकऱ्यांनी अनैतिक संबंधांचा आरोप लावला आहे. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आठ आरोपींना ताब्यात घेतलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आधीच लग्न झाले होते. पण, तिचे लग्नानंतर एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती गावात पसरली. यानंतर गावच्या पंचायतीनेच या प्रेमी जोडप्याला तालिबानी शिक्षा सुनावली. त्या दोघांना नग्न करुन त्यांची गावभर धिंड काढण्यात आली. तसेच, त्यांना मारहाणही झाली. 

कार आणि बसचा भीषण अपघात, कारमधील 5 जणांचा होरपळून मृत्यू

या घटनेबाबत फारबिसगंजचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर.पी.सिंह म्हणाले, गावच्या पंचायतीच्या आदेशावरून जोडप्याला एकत्र बांधून मारहाण झाली आहे. सध्या या प्रकरणाचा तसाप सुरू असून, आतापर्यंत आठ जणांचा ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या इतर आरोपांची शोध सुरू आहे.
 

Web Title: Panchayat orders Talibani punishment, couple beaten by mob in Forbesganj bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.