भयंकर! रोज मिळायचे तुकडे, पोलिसांनी घरोघरी जाऊन 500 फ्रिज उघडून पाहिले; असा झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:56 AM2022-11-29T11:56:34+5:302022-11-29T11:57:26+5:30

पांडव नगरमधल रामलीला मैदान परिसरात पोलिसांना मानवी शरीराचे तुकडे मिळाले. दररोज तुकडे सापडत होते

pandav nagar murder delhi police after recovering body parts searched fridges in houses opposite ramlila ground | भयंकर! रोज मिळायचे तुकडे, पोलिसांनी घरोघरी जाऊन 500 फ्रिज उघडून पाहिले; असा झाला पर्दाफाश

भयंकर! रोज मिळायचे तुकडे, पोलिसांनी घरोघरी जाऊन 500 फ्रिज उघडून पाहिले; असा झाला पर्दाफाश

Next

दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पांडव नगरमधल रामलीला मैदान परिसरात पोलिसांना मानवी शरीराचे तुकडे मिळाले. दररोज तुकडे सापडत होते. मात्र ते कोणाच्या मृतदेहाचे आहेत त्याची माहिती मिळत नव्हती. गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास हाती घेतला. जवळपास पाच महिन्यांच्या मेहनतीनंतर अखेर गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.

रामलीला मैदानाच्या आसपास मृतदेहाचे तुकडे सापडत होते. पोलिसांनी परिसरातील घरांमध्ये असलेले फ्रिज तपासले. आसपासच्या भागातून दुर्गंधी येतेय का याबद्दलही स्थानिकांना विचारणा केली. अखेर पाच महिन्यांनी पोलिसांना आरोपी सापडले. मैदानाजवळ सापडत असलेले तुकडे अंजन दासच्या मृतदेहाचे असल्याचं पोलीस तपासातून उघडकीस आलं. तो बिहारचा रहिवासी होता. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने खुलासा केला आहे. अंजन दासची पत्नी पूनम आणि तिचा मुलगा दीपकनं अंजन दासची निर्घृण हत्या केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजन त्याचा सावत्र मुलगा दीपकच्या मुलीकडे, दीपकच्या बहिणीकडे वाकड्या नजरेनं पाहायचा. त्यामुळे दीपक आणि पूनमने अंजनच्या हत्येचा कट रचला. त्यांनी अंजनला नशेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याचा गळा चिरला. त्याचे मृतदेहाचे दहा तुकडे करुन फ्रिजमध्ये टाकले. पूनम आणि दीपक रोज रात्री घराबाहेर पडायचे आणि मृतदेहाचे तुकडे मैदानाच्या आसपास टाकायचे.

रामलीला परिसरात दररोज मानवी मृतदेहाचे तुकडे सापडत होते. मात्र मृताची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पोलिसांसमोर अवघड आव्हान होतं. पोलिसांना सर्वात आधी ब्लॉक 20 मधील रहिवाशांवर संशय आला. पोलिसांनी घरोघरी जाऊन फ्रिज तपासले. तुमच्याकडे फ्रिज आहे का, उघडून दाखवा, अशी विचारणा पोलिसांनी घरी येऊन केल्याचं ब्लॉक 20 मध्ये राहणाऱ्या सिकंदर सिंहनं सांगितलं.

पोलिसांनी जवळपास 500 फ्रिज उघडून पाहिले. घरात अतिरिक्त फ्रिज आहे का याबद्दल विचारणा केली. आसपासच्या परिसरातून तुम्हाला दुर्गंधी येते का, असा प्रश्न पोलिसांनी सिकंदरला विचारला. त्याने नाही असं उत्तर दिलं. ब्लॉक 20 मध्ये 500 घरं आहेत आणि या परिसरात असे अनेक ब्लॉक आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी किती मेहनत घेतली याची कल्पना करता येऊ शकेल, असं सिकंदर म्हणाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: pandav nagar murder delhi police after recovering body parts searched fridges in houses opposite ramlila ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.