बोगस लसीकरणप्रकरणी पांडेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 07:32 AM2021-08-06T07:32:12+5:302021-08-06T07:39:57+5:30
Crime News: अंधेरीच्या क्वीन मार्केट येथे झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणी अंबोली पोलिसांनी राजेश पांडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई : अंधेरीच्या क्वीन मार्केट येथे झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणी अंबोली पोलिसांनी राजेश पांडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बोगस लसीकरण प्रकरणी अविनाश बिद्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात मार्केटिंग विभागात काम करणाऱ्या पांडेने स्वतःची ओळख डॉक्टर म्हणून करून देत अविनाश यांच्याकडून ३ जून रोजी २ लाख ९४ हजार रुपये घेतले. त्यानंतर ४ जून रोजी २१८ लोकांचे लसीकरण केले. मात्र प्रमाणपत्र दिले नाही. पांडे हा मुंबईत झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. पांडे व त्याच्या साथीदारांनी १० ठिकाणी बनावट लसीकरण करून २,६०० हून जणांची फसवणूक केली.