खालापूर-हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:30 PM2021-10-20T17:30:57+5:302021-10-20T17:45:38+5:30

Pangolin Found : घरत यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित केले.

pangolin found in Khalapur-Hal village | खालापूर-हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर

खालापूर-हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर

Next
ठळक मुद्देखवले मांजराबाबत हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्यामार्फत प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला.

अंकुश मोरे     
                                                                                                                                                   

वावाेशी ः खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावातील अब्बाल धनसे यांच्या घराच्या परिसरात 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजता दुर्मिळ जातीचे खवले मांजर आढळले. प्राणी मित्रांच्या सहायाने खवले मांजर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. खवले मांजर पाहण्यासाठी नागरिकांनी माेठ्या संख्येने गर्दी केली हाेती.
खवले मांजराबाबत हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्यामार्फत प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला.

घरत यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित केले. खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची त्यांनी माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यासह अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. ताेपर्यंत खवले मांजर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त्या खवले मांजराजवळ कोणाला जाऊ न देता त्यावर पाळत ठेवली होती.

अभिजीत घरत आणि  खालापूर तालुका वनखात्याचे कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी त्या खवले मांजराची संपूर्ण शारीरिक तपासणी केली असता त्याच्या अंगाला लागलेला चिखल आणि मातीत माखलेली नखे यावरून ते वाट चुकून शिकारीच्या शोधात त्याठिकाणी आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला कोणतीही जखम झाली नव्हती. याची खात्री करून त्यांनी त्याला सुरक्षित पिंजर्‍यात बंद केले आणि वनखात्याच्या नियमाप्रमाणे पंचनामा करून ताब्यात घेतले.                                                                                                                                                                                     खवले मांजर हे फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. आशिया व आफ्रिका खंडात हे खवले मांजर सापडते. हे प्राणी शक्यतो पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतात. खवले मांजर निशाचर असून त्यांचा आहार प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी हा आहे. सहसा हा प्राणी एकटा राहतो. केवळ प्रजननासाठी नर मादी भेटतात. खवले मांजराची मांसासाठी शिकार केली जाते. सुरक्षीत वन क्षेत्र कमी झाल्याने ते मानवी वस्तीत आढळल्याची माहिती अभिजित घरत यांनी दिली.                                                                                                                                                                                                                                                

खवले मांजर या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे. सद्यस्तिथीत त्यांची नोंद आययुसीएन रेड लिस्टच्या "धोका असलेली प्रजाती" आहे. त्यांच्या जीविताला धोका असल्याने तिसऱ्या हाळमधील जागरुक नागरिकांनी प्रसंगावधान राखून या दुर्मिळ प्रजातीला वाचवल्या बद्दल खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामजिक संस्थेने सर्वांचे कौतुक केले आहे.

Web Title: pangolin found in Khalapur-Hal village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.