अयोध्येत खळबळ! रामजन्मभूमीजवळ संशयित बांगलादेशींना पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 06:23 PM2022-02-17T18:23:53+5:302022-02-17T18:24:26+5:30
Suspicious Bangladeshi Arrested : दिल्ली आणि मथुरेचे पत्ते असलेली दोन आधार कार्डेही जप्त करण्यात आली आहेत. संशयिताकडून एक सॅमसंग मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.
अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराजवळून एका संशयित बांगलादेशीलापोलिसांनी गुरुवारी अटक केली. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींची पोलीस चौकशी करत होते. शुक्रवारी पोलिसांनी बांगलादेशी तरुणाची तुरुंगात रवानगी केली. त्याच्याकडून दिल्ली आणि मथुरेचे पत्ते असलेली दोन आधार कार्डेही जप्त करण्यात आली आहेत. संशयिताकडून एक सॅमसंग मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.
अयोध्या जिल्ह्यातील रामजन्मभूमी परिसरात पोलीस स्टेशनमध्ये तपासणीदरम्यान बांगलादेशातील एका संशयित व्यक्तीला पकडण्यात आले आहे. सीओ आरके चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, राजघाट येथून संशयिताची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याच्या वास्तव्याचा कोणताही वैध पुरावा सापडला नाही, त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. दुलालचंद यांचा मुलगा अनिवेश चंद्र दास असं या तरुणाचं नाव असून तो चारहोगला गाव, पोलीस स्टेशन मेहंदी गंज जिल्हा भरीवाल बांगलादेश येथील रहिवाशी आहे. तरुणाकडून बांगलादेशी वंशाचे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. तो बराच काळ भारतात लपून राहत होता.
बंद खोलीत किंचाळ्यांचा आवाज घुमत होता, शेजाऱ्याने ११ वर्षीय मुलीची लुटली अब्रू
रामजन्मभूमी दर्शन मार्गावरील राम गुलेला येथील एका व्यक्तीला गुरुवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी थांबवून संशयास्पद स्थितीत पकडले. गुप्तचर व गुप्तचर पथकांनी त्याची चौकशी केली. अटक करण्यात आलेला तरुण स्वत:ला निरक्षर सांगत आहे. त्याच्याकडून बांगलादेशी भाषेतील पुस्तक जप्त करण्यात आले आहे.