अयोध्येत खळबळ! गरोदर शिक्षिकेची भरदिवसा निर्घृण हत्या, निर्माण झाले प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 12:33 PM2022-06-02T12:33:13+5:302022-06-02T12:45:12+5:30
Murder Case : मग मारेकऱ्यांनी ही घटना कशी घडवली? यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात घरात काम करणाऱ्या कामगारांचीही चौकशी केली जात आहे.
अयोध्या कोतवाली परिसरातील श्रीराम पुरम कॉलनीत गरोदर शिक्षिका सुप्रिया वर्मा यांची भरदिवसा घरात हत्या करण्यात आली. घटनेनंतर मारेकरी फरार झाले, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी एक पथकही तयार केले आहे.
ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. मात्र, पोलिसांना घटनेची माहिती उशिरा मिळाली. यामागचे कारण असे सांगितले जात आहे की, मृत महिलेचा पती आणि तिच्या सासूला आधी तिचा गर्भपात झाला असे वाटले. पण जेव्हा मृत महिलेला तिला ट्रॉमा सेंटरमध्ये घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, ही हत्या आहे आणि गळ्यावर चाकूने वार केले होते. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस अयोध्येतील दर्शन नगर येथील ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचले. घटनेच्या वेळी शिक्षिका घरात एकटीच होती. तिची सासू आणि पती काही कामानिमित्त फैजाबाद शहरात आले होते. ते परत आल्यावर त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांच्या बांधकामाधीन घरात काम सुरू होते आणि काही कामगारही काम करत होते.
मग मारेकऱ्यांनी ही घटना कशी घडवली? यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात घरात काम करणाऱ्या कामगारांचीही चौकशी केली जात आहे. सुप्रिया वर्मा नावाच्या या शिक्षिका बिकापूर ब्लॉकच्या अस्करनपूर प्राथमिक शाळेत शिकवत होत्या आणि त्यांचे पती देखील बिकापूर ब्लॉकमध्ये शिक्षक आहेत.
Ayodhya, Uttar Pradesh | Man says his pregnant wife was killed by unknown persons at their home today morning
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 1, 2022
The woman was alone at home when the incident occurred. Soon after the incident, she was taken to the hospital where she was declared dead. Case registered: Police pic.twitter.com/QLIDFN4kOP
सध्या पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून मृतदेहावर चाकूने वार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. सुरुवातीला घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी लूटमारीच्या उद्देशाने ही हत्या केल्याची चर्चा होती, मात्र दिवसाढवळ्या घरात काम सुरू असताना दरोडेखोरांनी असा काही प्रकार केला का, असाही मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
त्यामुळे घटनेच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलीस मृताचे कुटुंबीय आणि आजूबाजूच्या लोकांची तसेच घरात काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करत आहेत. यासोबतच आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात असून मारेकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लवकरच या घटनेचा खुलासा केला जाईल, असे अयोध्या पोलिसांचे म्हणणे आहे. काही महत्त्वाचे क्लूजही पोलिसांच्या हाती लागले असून, त्याचीही पडताळणी सुरू आहे. मृतांचे नातेवाईकही पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत, त्यामुळेच या घटनेबाबत त्यांची आणि त्यांच्या जवळच्या मित्रांचीही चौकशी केली जात आहे.