दिल्लीत खळबळ! बेवारस टिफिन बॉक्स सापडला, बीडीडीएसचे पथक घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 19:49 IST2022-08-04T19:49:24+5:302022-08-04T19:49:53+5:30
Crime News : सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने परिसर रिकामा केला आहे.

दिल्लीत खळबळ! बेवारस टिफिन बॉक्स सापडला, बीडीडीएसचे पथक घटनास्थळी
नवी दिल्ली : बेवारस टिफिन बॉक्स सापडल्यानंतर उत्तर दिल्लीत खळबळ उडाली आहे. मात्र, बॉम्बशोधक पथकाला याची माहिती मिळताच त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने परिसर रिकामा केला आहे.
बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला बॉक्समध्ये काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहिणीच्या प्रशांत विहारमधून ही बाब उघडकीस आली. नॅशनल सिक्युरिटी गार्डलाही पाचारण करण्यात आले. बॉक्स उघडण्यापूर्वी परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती. स्वातंत्र्य दिनापूर्वी संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत.
याआधीही दिल्लीत या पद्धतीची प्रकरणे समोर आली आहेत. या वर्षी एप्रिल महिन्यात दक्षिण दिल्लीतील आरके पुरमच्या मोहम्मदपूर भागात एक हँडग्रेनेड सापडला होता. जानेवारीमध्ये दिल्लीच्या गाझीपूर फुल मार्केटमध्ये एका बेवारस बॅगेत बॉम्ब सापडला होता. नंतर तो बॉम्ब निकामी करण्यात आला. त्याचवेळी दिल्लीतील रोहिणी कोर्टात टिफिनसारख्या वस्तूमध्ये बॉम्ब असल्याची बाब समोर आली. मात्र, या बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात न्यायालय क्रमांक 102 चे नायब (पोलीस) जखमी झाले. हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. स्फोटामुळे जमिनीत खड्डा पडला होता. हा एक प्रकारचा क्रूड बॉम्ब होता.