नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ, पतीने व्यक्त केली 'ही' भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 08:17 PM2022-03-14T20:17:08+5:302022-03-14T20:26:28+5:30
Murder Case : मृत महिलेचा पती शेतातून घरी पोहोचला असता पत्नीचा मृतदेह पाहून त्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एका महिलेचा मृतदेह तिच्याच घरात नग्न अवस्थेत सापडल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचा पती शेतातून घरी पोहोचला असता पत्नीचा मृतदेह पाहून त्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. त्याचवेळी खून आणि बलात्काराची भीती दाखवत मृतकाच्या पतीने या प्रकरणाचा खुलासा करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
नग्नावस्थेत रक्ताने माखलेला मृतदेह सापडला
ही घटना अमरोहा जिल्ह्यातील आदमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे एक माणूस त्याच्या मुली आणि पत्नीसोबत राहतो. शेतकरी असल्याने हा व्यक्ती रात्री शेतात गेला होता, आज सकाळी तो घरी पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा उघडला नाही. वृत्तानुसार, बराच वेळ दरवाजा न उघडल्याने तो माणूस शेजारच्या घरातून घराच्या छतावर पोहोचला आणि त्याने घराच्या अंगणात लावलेल्या जाळ्यातून डोकावले तर त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात नग्न अवस्थेत पडली होती. .
खून आणि बलात्काराचा आरोप
मृत महिलेचा पती धीर सिंग याने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या पीडित धीर सिंगने पत्नीचा खून आणि बलात्कार झाल्याची भीती व्यक्त केली असून या प्रकरणाचा खुलासा करण्याची मागणीही पोलिसांकडे केली आहे.
हसनपूर सर्कलचे डेप्युटी एसपी सतीश चंद्र पांडे म्हणाले, "आदमपूर पोलिस स्टेशनच्या गावात एका महिलेचा मृतदेह घरात आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
मृतकाच्या पतीने सांगितले की, मी बहुतांशी शेतावरच राहतो, सकाळी ७ वाजता मी शेतातून घरी आलो, तेव्हा आतून कडी लावली होती, मग मी छतावरील जाळीतून डोकावले तर माझी पत्नी विवस्त्र अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या डोक्यालाही मार लागला होता, कोणीतरी खूप मारल्याचं दिसत होतं, मी लगेच पोलिसांना कळवलं आणि तासाभरानंतर पोलीस इथे आले.