बेवारस बॅगेमुळे ठाण्यात खळबळ; 'ती' बॅग निघाली अपंग व्यक्तीची
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 01:26 PM2021-10-11T13:26:52+5:302021-10-11T13:27:45+5:30
Unwanted Bag Found in Thane : ती बॅग एका अपंग व्यक्तीची असल्याचे अखेर समोर आल्याने ठाणेकर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
ठाणे: एकीकडे बंद पाळला जात असताना,मात्र दुसरीकडे ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावाच्या ठिकाण बेवारस बॅग सापडलेल्या एकच खळबळ उडाली आहे. ती बॅग एका अपंग व्यक्तीची असल्याचे अखेर समोर आल्याने ठाणेकर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ही घटना दुपारच्या समोर आली.
ठाणे महानगरपालिकेजवळ, कचराळी तलाव बाजूला असलेल्या पदपथावर अज्ञात व्यक्तीने बऱ्याच वेळापासून बेवारस बॅग ठेवली आहे, अशी माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात मिळाली त्यानुसार घटनास्थळी पाहणी केली असता, एक बॅग लोखंडी बेंचला बांधून ठेवण्यात आली होती. काही वेळात बॅगेचे मालक समीर कुमार सिंघ (४५) हे घटनास्थळी पोहोचले. सदरची व्यक्ती अपंग असल्याने त्यांच्या नातेवाईकांची वाट बघत असताना ते नाष्टा करण्यासाठी सदरची बॅग बेंचला बांधून १० वाजण्याच्या तिकडून गेले असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी तसेच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी धाव घेतली. ती बॅग मालकाच्या ताब्यात देऊन पुन्हा अशी चूक करू नका असे बजावण्यात आल्याची माहिती कक्षाप्रमुख संतोष कदम यांनी दिली.