...अन् आणखी एका महिलेने लगावली कारचालकाच्या कानशिलात, भररस्त्यात केली बॅटने मारहाण; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 05:10 PM2021-08-07T17:10:41+5:302021-08-07T17:36:05+5:30
Woman beats up car driver in panipat video viral : एका महिलेने कारचालकांशी आधी वाद घातला. त्यानंतर त्याच्या कानशिलात लगावली. तिने बॅटने देखील त्याला मारहाण केली.
नवी दिल्ली - लखनऊमध्ये भररस्त्यात एका तरुणीने कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून संतापाची लाट उसळली आहे. तरुणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकारानंतर आता अशीच दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी एका महिलेने कारचालकाच्या कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरच ती महिला थांबली नाही तर तिने बॅटने देखील कारचालकाला मारहाण केली आहे.
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणारा हा व्हिडीओ पानिपतच्या शेरा गावातील आहे. एका महिलेने कारचालकांशी आधी वाद घातला. त्यानंतर त्याच्या कानशिलात लगावली. तिने बॅटने देखील त्याला मारहाण केली. तसेच आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले आणि कारचालकाची धुलाई केली. जवळपास अर्धा तास रस्त्यावर हा हायवोल्टेज ड्रामा सुरू होता. यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा देखील खोळंबा झाला. कारचालकाने 112 नंबरवर फोन करून आपला जीव वाचवला. तसेच याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
After the #lucknowgirl it's #panipatgirl now
— ΛBHISHΞK JOHNS (@ft_abhishekj) August 6, 2021
Not all ladies But .[____] pic.twitter.com/X6slcq7Ci6
डीएसपी सतीश वत्स यांनी दिेलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं देखील म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये महिला तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. लखनऊसारखीच ही घटना असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! ...त्यानंतर अल्पवयीन मुलगा घरी परत आलाच नाही; घटनेने खळबळ#Crime#Policehttps://t.co/jDtVDg4SOf
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2021
सरकारी क्वार्टरमध्ये आढळला अल्पवयीन मुलाचा मृतदेह: कुटुंबीयांनी केला दुष्कर्म अन् हत्येचा गंभीर आरोप
राजस्थानच्या बिजलिया परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सरकारी क्वार्टरमध्ये अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी दुष्कर्म आणि हत्येचा गंभीर आरोप केला आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर मुलाच्या नातेवाईकांनी आता आरोप केले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका जुन्या सरकारी क्वार्टरमध्ये शिनाख्त परिसरात राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
कानातच अचानक ईअरफोनचा स्फोट झाला, मोठा आवाज आला अन्...#earphone#deathhttps://t.co/YBejMuPqsP
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2021