धक्कादायक! पप्पन सिंह गहलोत यांची आत्महत्या; लॉकडाऊनमध्ये मजुरांना विमानाने पाठवलेलं घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 09:26 AM2022-08-26T09:26:23+5:302022-08-26T09:34:11+5:30

Pappan Singh Gahlot : लॉकडाऊनमध्ये शेतात काम करणाऱ्या मजुरांना आपल्या खर्चातून प्लेनचं तिकीट खरेदी करून बिहारला पाठवणाऱ्या पप्पन सिंह गहलोत यांनी आत्महत्या केली आहे.

Pappan Singh Gahlot ended his life who buys air tickets for labourers in covid lockdown | धक्कादायक! पप्पन सिंह गहलोत यांची आत्महत्या; लॉकडाऊनमध्ये मजुरांना विमानाने पाठवलेलं घरी

फोटो - NBT

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात मजुरांसाठी देवदूत ठरणाऱ्या एका व्यक्तीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये शेतात काम करणाऱ्या मजुरांना आपल्या खर्चातून प्लेनचं तिकीट खरेदी करून बिहारला पाठवणाऱ्या पप्पन सिंह गहलोत (Pappan Singh Gahlot) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे.लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारी ही व्यक्ती आत्महत्या कशी करू शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

मंदिरामध्ये लटकलेल्या अवस्थेत गहलोत यांचा मृतदेह आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या बख्तावरपूरमधील तिगीपूर गावात मशरूमशी शेती करणारे पप्पन सिंह यांना दोन वर्षांपूर्वी आपल्या कृतीमुळे खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्याची स्टोरी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही शेअर केली होती. नंतर पप्पनने आपल्या मजुरांना विमानानेच दिल्लीला बोलावण्याची व्यवस्था केली होती. पप्पन यांच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पप्पन 10 मजुरांसोबत काम करायचे, कोरोना लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्यानंतर त्या सर्वांना त्यांनी स्वतःच्या पैशाने विमानाचे तिकीट खरेदी करून घरी पाठवले. यामध्ये त्यांनी तब्बल 68 हजार रुपये खर्च केले होते. काही परप्रांतीय मजुरांनी तर सांगितले होते की, मालकाला तिकीट मिळाले आहे, आज मी विमानात बसेन. हे मजूर प्रथमच विमानाने प्रवास करत होते. दिल्लीच्या मशरूम शेतकऱ्याच्या या कृतीचं देशभरात कौतुक झालं. यातील काही मजूर जवळपास 20 वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत होते.

कोरोनाच्या काळात जेव्हा मजुरांनी त्यांच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा पप्पन यांनी आधी रेल्वेचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी विमानाचे तिकीट काढले आणि मजुरांना घरी पाठवले. पप्पनचा भाऊ निरंजन गहलोतही कामगारांना बसवण्यासाठी विमानतळावर आला होता. पप्पन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, माझे मजूर घरापासून इतके लांब आले असतील तर त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारीही माझी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: Pappan Singh Gahlot ended his life who buys air tickets for labourers in covid lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.