कोंढव्यातील ' तो ' शरीराचा थरकाप उडविणारा खून व्याजाच्या कारणावरुन; तीन जणांना पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 02:23 PM2020-07-16T14:23:21+5:302020-07-16T14:33:30+5:30

४९ लाख रुपये व्याजाने दिले असताना त्यावर २ कोटी रुपये वसुल केल्यानंतरही सतत पैशाची मागणी धमकीमुळे खून

Pappu Padwal's murder from issue of money interest ; three person arrested by police | कोंढव्यातील ' तो ' शरीराचा थरकाप उडविणारा खून व्याजाच्या कारणावरुन; तीन जणांना पोलिसांनी केली अटक

कोंढव्यातील ' तो ' शरीराचा थरकाप उडविणारा खून व्याजाच्या कारणावरुन; तीन जणांना पोलिसांनी केली अटक

googlenewsNext
ठळक मुद्देकोंढवा पोलिसांनी आणला गुन्हा उघडकीस, तिघे जण ताब्यात

पुणे : कोंढवा येथील ब्रम्हा काँट्री बिल्डिंगमध्ये घनश्याम ऊर्फ पप्पू पडवळ याचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोंढवापोलिसांना यश आले असून पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. ४९ लाख रुपये व्याजाने दिले असताना त्यावर २ कोटी रुपये वसुल केल्यानंतरही आणखी सतत पैशाची मागणी केल्यामुळे व सततच्या धमकीमुळे वैतागलेल्या एकाने दोन साथीदाराच्या मदतीने पप्पू पडवळचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. 
लतिफ आबु शेख (वय ४३, रा. पारगेनगर, कोंढवा) असे प्रमुख संशयिताचे नाव आहे़. 
पप्पू पडवळ हा गेल्या काही वर्षापासून व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. त्याने कोंढव्यातील लतिफ शेख याला वेळोवेळी ४९ लाख रुपये दिले होते. लतिफ हा स्कॅप व फॅबिकेशनचे काम करतो. कर्जासाठी त्याने फ्लॅट व कागदपत्रे गहाण ठेवले होते. लतिफने त्याला आतापर्यंत २ कोटी रुपये दिले तरीही पप्पू पडवळ पैशाची मागणी करीत होता. आणखी ८० लाख रुपये १५ तारखेपर्यंत दिले नाही तर तुझा मर्डर करतो, अशी धमकी दिली होती. त्यामुळे लतिफ याने पप्पूच्या खुनाचा कट रचला.
लतिफ यांची आई आजारी असताना त्याने एका मौलानाकडून तिच्यावर उपचार केले होते. त्यातून ती बरी झाली होती. ही गोष्ट त्याने पप्पूला सांगितली होती. पप्पू यालाही झोप न येणे व इतर आजार होते. त्याने लतिफला त्या मौलानाला घेऊन येण्यास सांगितले. त्यामुळे पप्पूच्या घरात शिरण्याची संधी लतिफला मिळाली. 
 

असा केला खुन
९ जुलै रोजी लतिफ पप्पूच्या घरी गेला़ त्याने मौलाना येत असल्याचे सांगितले. काही वेळाने नेहरु शर्ट घातलेले दोघे जण आले. त्यांच्या गळ्यात बॅग होती. त्याने हे मौलाना आहेत, असे सांगितले. आलेल्या दोघांनी पप्पूला खाली बसविले. त्याच्यासमोर लिंबू कापून ठेवले व मंत्र म्हणण्याचा बहाणा करुन त्याला डोळे बंद करायला सांगितले. जसे पप्पूने डोळे बंद केले़ तसे मागे उभे असलेल्याने आपल्याकडील बॅगेतून कोयता काढून पप्पूवर वार करायला सुरुवात केली. त्याचा मृत्यु झाल्याचे लक्षात आल्यावर ते सर्व जण घर बंद करुन निघून गेले.११ जुलै रोजी पप्पूचा खुन झाल्याचे उघडकीस आले. 

असा केला तपास
खून करताना कोणीही पाहणारे नव्हते़ पप्पू हा कोणा कोणाला व्याजाने पैसे देतो, त्याची नोंद एका डायरीत करत असे़ पोलिसांनी ही डायरी तपासली़ तेव्हा तो तब्बल ३५ टक्के व्याजाने पैसे देत असल्याचे दिसून आले. त्यात शेकडो लोकांची नावे होती. गेल्या चार पाच दिवसात कोंढवा पोलिसांनी सर्व तांत्रिक विश्लेषण करुन त्यापैकी अनेकांकडून माहिती घेतली. त्यात त्याचा लतिफवर संशय बळावला. त्यांनी ९ जुलै रोजी लतिफ कोठे कोठे गेला होता. त्याची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. तेव्हा तो त्या ठिकाणी गेला नसल्याचे उघड झाले. पोलिसांना सर्व समजल्याचे लक्षात आल्यावर लतिफ याने गुन्हा कबुल केला.

पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार व पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी सतत पाच दिवस तपास करुन हा गुन्हा उघडकीस आणला. 
़़़़़़़़़
मैने हैवान को मार डाला...
तपास करताना पोलिसांनी त्याला ९ जुलै रोजी कोणते कपडे घातले होते, ते घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा त्याने ते कपडे आणल्यानंतर जॅकेट धुतले असले तरी त्यावर एका ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. तसेच त्याने तेव्हा सुरक्षारक्षकाची चप्पल वापरली होती़. उंड्री येथे तो गेलाच नव्हता. हे सर्व उघड झाल्यावर तो पोलिसांसमोर रडू लागला व म्हणाला, मैने हैवान को मार डाला..

Web Title: Pappu Padwal's murder from issue of money interest ; three person arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.