परमबीर सिगांनी सायबर तज्ञाला दिले होते ५ लाख अन् अँटिलीया स्फोटक प्रकरणात केली फेरफार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 08:40 PM2021-09-08T20:40:29+5:302021-09-08T20:51:08+5:30
Antilia Case :माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलीया स्फोटक प्रकरणाची फेरफार करण्यासाठी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा सायबर तज्ज्ञांनी केला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दाखल केलेल्या एका आरोपपत्रात एजन्सीमधील एका सायबर तज्ज्ञाने धक्कादायक माहिती दिली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलीया स्फोटक प्रकरणाची फेरफार करण्यासाठी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा सायबर तज्ज्ञांनी केला आहे. यासाठी परमबीर सिंग यांनी सायबर तज्ज्ञाला ५ लाखांची लाच दिली असल्याचंही त्यानं सांगितलं आहे.
NIAने सायबर तज्ञाचा ५ ऑगस्टला जबाब नोंदवला होता. तेव्हा त्येनं तो अनेक आयपीएसला सायबरशी संबंधित ट्रेनिंग देतो असे सांगितले. सोबतच काही इंटेलिजेंस एजन्सी सोबतही काम करतो अशी माहिती दिली. ९ मार्च २०२१ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात ट्रेनिंग संबंधी चर्चेसाठी गेलो होतो, अशीही धक्कादायक माहिती त्याने दिली.
सायबर तज्ज्ञाने एनआयएला आपला जबाब नोंदवला होता. ज्यामध्ये सायबर तज्ज्ञाने अँटिलिया घटनेनंतर जैश-उल-हिंद या दहशदवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्विकारली, असे त्यांना त्यांच्या अहवालात लिहिण्यास सांगितले असल्याची माहिती दिली. त्यासाठी दिल्लीत इस्रायल दूतावासासमोर स्फोट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनेलचा वापर करण्यात आला. तपास यंत्रणेला सुरुवातीपासूनच अँटिलीया स्फोटक प्रकरणात समोर आलेल्या जैश-उल- हिंदच्या कटात परमबीर सिंग यांचा सहभाग असल्याता संशय आहे. मात्र त्यांनी आपल्या आरोपपत्रात परमबीर सिंग यांची भूमिका काय आहे याबाबत काही स्पष्ट केले नाही. मात्र आता सायबर तज्ज्ञाने परमबीर यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे परमबीर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अंबानी यांच्याकडील सुरक्षा प्रमुखाने NIA ला जबाब दिला. २५ फेब्रुवारीला अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी आढळली. त्याचा जबाब आरोपपत्रात दाखल केला आहे. NIA ने ३ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.