Parambir Singh: परमबीर सिंगांना कधीही अटक होण्याची शक्यता; घाडगे प्रकरण भोवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:07 AM2021-04-29T11:07:04+5:302021-04-29T11:11:11+5:30
Thane Police will possible take action on Parambir Singh: वादग्रस्त तसेच अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचे आरोप असलेले मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी गंभीर तक्रार केली होती.
पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे (Bhimrao Ghadge) यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे काल अकोल्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून परमबीर यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. (An FIR has been registered against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh, DCP Parag Manere and other police officers in Akola.)
सुत्रांनी दिलेल्या माहीती नुसार वादग्रस्त तसेच अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचे आरोप असलेले मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी गंभीर तक्रार केली होती. त्यांच्या या तक्रारीच्या विरुध्द अकोला येथील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये परमबीर यांच्या विरोधात तब्बल २७ विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात परमबीर सिंग यांना कधीही अटक होवू शकते.
भिमराव घाडगे यांना एका खोट्या चकमक प्रकरणी परमबीर सिंग यांनी अडकविले होते. काही बिल्डरांना गुन्ह्यातून वाचविण्यास परमबीर सिंग यांनी घाडगे यांना सांगितले होते. परंतु त्या बिल्डरांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांना वाचवू शकत नाही, असे सांगत घाडगे यांनी परमबीर सिंग यांना नकार दिला होता. घाडगे हे आपले ऐकत नसल्याने परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरुध्द कट रचला होता. एका खोट्या चकमकीच्या गुन्ह्यात त्यांना अडकविले होते. नंतर या प्रकरणाचा तपास झाला आणि त्या गुन्ह्यातून न्यायालयाने भिमराव घाडगे यांना निर्दोष सोडले होते.
घाडगे दांपत्याचे अंडा सेलमध्ये सव्वा वर्ष
परमबीर सिंग यांच्या जवळच्या सहा व्यक्तींवर गंभीर स्वरुपाचे पुराव्यासहती गुन्हे दाखल केल्यामुळे घाडगे यांच्यावर तत्कालीन ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते. एवढेच नाही तर घाडगे यांना त्यांच्या पत्नीसह एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखे किंवा आतंकवादी असल्यासारखे दाखवून त्यांना नवी मुंबई येथील तळोजा कारगृहात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. कोणताही गुन्हा नसताना घाडगे आणि त्यांच्या पत्नीने एक वर्ष दोन महिने अंडासेलमध्ये घालविले.
२७ पोलीस अधिकारी जाळ्यात...
मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.