पोटच्या मुलीलाच विकायला निघाले आई-बाप!; पोलिसांनी हाणून पाडला डाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 06:37 AM2021-12-12T06:37:04+5:302021-12-12T06:37:42+5:30

सहा जणांना केली अटक

parents came to sell theor daughter thane police arrested them | पोटच्या मुलीलाच विकायला निघाले आई-बाप!; पोलिसांनी हाणून पाडला डाव 

पोटच्या मुलीलाच विकायला निघाले आई-बाप!; पोलिसांनी हाणून पाडला डाव 

Next

तीन मुलांच्या पाठोपाठ चौथी मुलगी झाल्याने तिला दीड लाखांमध्ये विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील दाम्पत्यासह दलाल आणि दोन नातेवाइकांचा ‘डाव’ ठाणे शहर पोलीस दलाच्या ठाणे गुन्हे शाखेने शनिवारी उधळून लावला. यावेळी सहा जणांना अटक करून ‘त्या’ ३ ते ४ दिवसांच्या मुलीला सुश्रुषेसह संगोपनासाठी डोंबिवलीच्या जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट येथे ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.      

भिवंडीतील वकील अन्सारी व मुमताज अन्सारी हे त्यांची ३ ते ४ दिवसांपूर्वी जन्मलेली मुलगी दीड ते दोन लाख रुपये किमतीस विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहेत, अशी बातमी ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी बनावट खरेदीदार बनून नवजात बालिकेची विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला. त्या नवजात बालिकेचे आईवडील व मध्यस्थी महिला यांनी नवजात बालिकेचा दीड लाखात सौदा ठरविल्यावर त्यांना ठाण्यातील कॅसल मिलनाका येथील स्वागत हॉटेल, येथे नवजात बालिकेस घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी त्या हॉटेलमध्ये सापळा रचून ठरल्याप्रमाणे नवजात बालिकेचे विक्रीकरिता आलेल्या व्यक्तींनी बनावट खरेदीदार बनून गेलेल्या पोलिसांकडून दीड लाखांची रक्कम स्वीकारून त्यांच्याकडील नवजात बालिकेला सुपूर्द करताच त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा डाव हाणून पाडला.
 
भिवंडी शांतीनगरमधील रिक्षाचालक वकील शकील अन्सारी (३७) त्याची पत्नी मुमताज या दाम्पत्यासह मुमताज हिचे बहीण-भाऊ कायनात रिझवान खान (३०) आणि मुझम्मिल रिझवान खान (१८,रा. मुंब्रा) तसेच दलाल झिनत रशिद खान (२२) व वसीम इसाक शेख (३६, रा. मुंब्रा) अशा सहा जणांविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७० सह द जुवेनाईल जस्टीस केअर ॲन्ड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स ॲक्ट २०१५ चे कलम ८०,८१ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना राबोडी पोलिसांच्या हवाली केले.         

संगोपनासाठी ठेवले ‘जननी आशिष’मध्ये
विक्री करण्यासाठी आणलेल्या नवजात बालिकेचा जन्म हा ४ डिसेंबर २०२१ रोजी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालय येथे झालेला असून, तिला घटनास्थळी ताब्यात घेतल्यावर पुढील सुश्रुषेसह संगोपनासाठी डोंबिवलीच्या जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट येथे ठेवले आहे, अशी माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली.

त्या दाम्पत्याला पहिले तीन मुले आहेत. त्यातच त्यांना चौथी मुलगी झाली. म्हणून त्यांनी त्या मुलीचा सौदा केला. त्या दाम्पत्यासह सहा जणांना पकडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
अनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट १, ठाणे

Web Title: parents came to sell theor daughter thane police arrested them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.