आई-बाप अंधारात! चुलत भावासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती, लग्नाची मागणी करताच सुटकेसमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:17 IST2025-01-27T13:17:10+5:302025-01-27T13:17:30+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पहाटेच राजधानी दिल्लीत एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये जळालेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली होती.

Parents in the dark! shilpa pandey was living in a live-in with her cousin, as soon as she proposed marriage, she was in a suitcase... | आई-बाप अंधारात! चुलत भावासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती, लग्नाची मागणी करताच सुटकेसमध्ये...

आई-बाप अंधारात! चुलत भावासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती, लग्नाची मागणी करताच सुटकेसमध्ये...

प्रजासत्ताक दिनाच्या पहाटेच राजधानी दिल्लीत एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये जळालेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने तिचा मृतदेह दूर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतू, ते शक्य न झाल्याने अखेरीस दिल्लीतच सुनसान जागी मध्यरात्री तिला जाळण्यात आले. तपासाच जे समोर आले त्यामुळे पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली.

दिल्लीच्या गाझीपूरमध्ये हा मृतदेह सापडला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यापैकी एक या तरुणीचा चुलत भाऊ आहे. मृत मुलीचे नाव शिल्पा पांडे आहे. अमित तिवारी तिचा चुलत भाऊ लागतो. त्याच्यासोबत ती खोडा कॉलनीमध्ये लिव्ह इनमध्ये राहत होती. वर्षभर त्यांच्यात संबंध होते. दोघेही २२ वर्षांचे होते. शिल्पाने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. 

२५ जानेवारीच्या रात्री देखील सर्व उरकल्यावर शिल्पाने अमितला लग्न करुया असे म्हटले. यावरून अमित भडकला आणि त्याने दारुच्या नशेत तिचा गळा आवळला. ती मेल्याचे समजताच त्याने आपल्या एका मित्राला फोन केला व  त्याला तिचा मृतदेह विल्हेवाट लावायचा असल्याचे सांगितले. 

मित्र आणि तो मतदेह कुठे जाळता येतो का हे पाहण्यासाठी कार घेऊन निघाले. परंतू, त्यांची पोलीस बंदोबस्तामुळे दोनवेळा चेकिंग झाली. यामुळे त्यांनी दिल्लीबाहेर तिचा मृतदेह जाळण्याचा प्लॅन बदलला व आसपासच मृतदेह जाळण्याचा निर्णय घेतला. घरी येत शिल्पाला सुटकेसमध्ये कोंबले आणि निर्मनुष्य जागी नेले. तिथे डिझेल टाकून तिला जाळण्यात आले. 

पोलिसांना पहाटे सव्वा चारला याबाबत समजले. यामुळे त्यांनी त्या भागात आलेल्या वाहनांचा शोध सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये उत्तर प्रदेशची कार दिसली. त्याच्या मालकाला पकडण्यात आले. त्याने ती कार अमितला विकल्याचे सांगितले. मग सारी सुत्रे अमितकडे वळली, त्याला पकडल्यावर चुलत बहीणीसोबत लिव्ह इन, शरीरसंबंध आणि लग्नाच्या मागणीबाबत समजले. तिचे आई वडील सुरतला राहतात, ते यांच्या या संबंधांबाबत अनभिज्ञ होते. 


 

Web Title: Parents in the dark! shilpa pandey was living in a live-in with her cousin, as soon as she proposed marriage, she was in a suitcase...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.