संतापजनक! निर्दयी आई वडिलांनीच मुलीची हत्या करून बनाव रचला; पोलिसही हादरले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 03:54 PM2022-09-05T15:54:14+5:302022-09-05T15:54:57+5:30

बागपतच्या सिंघावली येथील रहिवासी बबलू आणि त्यांची पत्नी रुबी कुटुंबासह गंगानगर भागात भाड्याच्या खोलीत राहत होते

Parents Killed Their 11 Year Old Daughter For Talking Her With Boys In Meerut UP | संतापजनक! निर्दयी आई वडिलांनीच मुलीची हत्या करून बनाव रचला; पोलिसही हादरले 

संतापजनक! निर्दयी आई वडिलांनीच मुलीची हत्या करून बनाव रचला; पोलिसही हादरले 

googlenewsNext

मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ येथे ह्दयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी जन्मदात्या आई वडिलांनीच पोटच्या ११ वर्षीय मुलीचा अंत केला आहे. मेरठच्या गंगानगर भागात ही घटना घडली. मुलीला कालव्यात फेकून देत आई वडिलांनी बनाव रचला. पोलिसांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना काहीच सुगावा सापडला नाही. 

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीच्या हत्येनंतर आईनं वारंवार बेशुद्ध होण्याचं नाटक केले परंतु सत्य सांगितले नाही. आई वडील दोघेही जबाब बदलत राहिले त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली. त्यानंतर मुलगा आरवनं सांगितले की, दीदीला आईपप्पा सोबत घेऊन गेले होते तेव्हा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दाम्पत्याशी चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघड झाला. एका क्षुल्लक कारणावरून आई वडिलांनीच मुलीला त्यांच्या हाताने कालव्यात फेकले त्यानंतर डोळ्यांदेखत तिला बुडून मरताना पाहिले. 

बागपतच्या सिंघावली येथील रहिवासी बबलू आणि त्यांची पत्नी रुबी कुटुंबासह गंगानगर भागात भाड्याच्या खोलीत राहत होते. या जोडप्याने १ सप्टेंबरच्या संध्याकाळी ११ वर्षीय मुलगी चंचलला कालव्यात फेकून दिले. त्यानंतर पोलीस ठाण्यात जात मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. तपासावेळी दोघांच्या जबाबात विरोधाभास आढळल्यानं संशयाच्या बळावर पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर कसून चौकशी केली असता दोघांनी पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. 

आरोपी आई वडिलांनी सांगितले की, चंचल फोनवरून नेहमी मुलांसोबत बोलायची. त्यामुळे अनेकदा तिच्याशी वाद झाले. खूप वेळा समजवून देखील चंचलने आई वडिलांचे ऐकलं नाही. त्यामुळे संतापाच्या भरात आई वडिलांनी निर्दयी कृत्य केले. चंचल गंगानगरच्या शारदा पब्लिक स्कूलमध्ये ५ वी च्या वर्गात शिकते. ती खूप शांत स्वभावाची होती असं शिक्षकांनी म्हटलं. तर एनडीआरएफच्या टीमने पोलिसांच्या मदतीने अनेक तास चंचलचा मृतदेह शोधण्याची मोहिम राबवली. परंतु आतापर्यंत चंचलचा मृतदेह हाती लागला नाही. चंचला मृतदेह शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं. तर आई वडिलांनी अशाप्रकारे भयाण कृत्य केल्याबाबत नातेवाईकांना विश्वास बसत नाही. पोलिसांनी आरोपी वडील आणि एका सहकाऱ्याला जेलमध्ये बंद केले आहे. तर आई रुबीला पोलिसांच्या सुरक्षेत घरात नजरकैदेत ठेवले आहे. 
 

Web Title: Parents Killed Their 11 Year Old Daughter For Talking Her With Boys In Meerut UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.