मोबाइल पाहतो म्हणून पालक ओरडले, १२ वर्षांच्या मुलाने घर सोडले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 07:17 AM2023-01-07T07:17:43+5:302023-01-07T07:18:02+5:30
अंधेरी पश्चिमच्या रतननगर परिसरात राहणारा संबंधित मुलगा शुक्रवारी सकाळी घरात नसल्याचे कुुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला.
मुंबई: वर्सोवा परिसरात एक बारा वर्षाचा मुलगा घरातून अचानक बेपत्ता झाला. ही बाब त्याच्या घरच्यांना कळल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि जवळपास सात तासांनंतर घराच्या गच्चीवर असलेल्या टाकीच्या खाली झोपलेला तो सापडला.
अंधेरी पश्चिमच्या रतननगर परिसरात राहणारा संबंधित मुलगा शुक्रवारी सकाळी घरात नसल्याचे कुुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ९ देखील या मुलाचा समांतररीत्या शोध घेऊ लागले. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. ज्यात हा अल्पवयीन मुलगा घरातून बाहेर पडत असताना आणि पुन्हा घराच्या दिशेने परताना दिसत होता. त्यामुळे तो घराच्या आसपास कुठेतरी असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही.
गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे पोलिस निरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी घटनास्थळी जात सीसीटीव्ही पाहिल्यावर सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला घेऊन ते घराच्या गच्चीवर गेले. वर असलेल्या टाकीच्या आसपास त्यांनी पाहिले. मात्र, तिथे कोणीच दिसत नव्हते. अखेर म्हेत्रे यांनी टाकीच्या खाली असलेल्या फुटांच्या पोकळीमधून आत प्रवेश केला. त्यावेळी अगदी कोपऱ्यात तो मुलगा त्यांना झोपलेला दिसला. त्याला अलगदपणे खाली आणत नंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
केमिस्टकडून चिप्स घेऊन खाल्ले
रात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहतो म्हणून त्याच्या आईने तो काढून घेतला होता. त्या रागात तो निघून गेल्याचे वर्सोवा पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच पहाटे उठून त्याने झोपेत अंगावर दोन ते तीन टी शर्ट घातले आणि जवळच्या केमिस्टकडे जात शीतपेय व चिप्स घेऊन खाल्ले, अशीही माहिती आहे. दरम्यान, मुलगा सुखरूप सापडल्याने आम्ही आता ही फाईल बंद करणार आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिराज इनामदार यांनी सांगितले. मुलाच्या वडिलांनी मुलाला शोधण्यात मदत केल्याबाबत पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, म्हेत्रे तसेच इनामदार आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले.
मुंबई: वर्सोवा परिसरात एक बारा वर्षाचा मुलगा घरातून अचानक बेपत्ता झाला. ही बाब त्याच्या घरच्यांना कळल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि जवळपास सात तासांनंतर घराच्या गच्चीवर असलेल्या टाकीच्या खाली झोपलेला तो सापडला.
अंधेरी पश्चिमच्या रतननगर परिसरात राहणारा संबंधित मुलगा शुक्रवारी सकाळी घरात नसल्याचे कुुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ९ देखील या मुलाचा समांतररीत्या शोध घेऊ लागले. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. ज्यात हा अल्पवयीन मुलगा घरातून बाहेर पडत असताना आणि पुन्हा घराच्या दिशेने परततताना दिसत होता. त्यामुळे तो घराच्या आसपास कुठेतरी असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे पोलिस निरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी घटनास्थळी जात सीसीटीव्ही पाहिल्यावर सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला घेऊन ते घराच्या गच्चीवर गेले. वर असलेल्या टाकीच्या आसपास त्यांनी पाहिले. मात्र, तिथे कोणीच दिसत नव्हते. अखेर म्हेत्रे यांनी टाकीच्या खाली असलेल्या फुटांच्या पोकळीमधून आत प्रवेश केला. त्यावेळी अगदी कोपऱ्यात तो मुलगा त्यांना झोपलेला दिसला. त्याला अलगदपणे खाली आणत नंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.