एकाच दिवसाचा पाहुणचार घेऊन आश्रमातून चार मुले पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 08:02 PM2023-04-05T20:02:40+5:302023-04-05T20:03:28+5:30
एक एप्रिल रोजी सकाळी योगाच्या निमित्ताने मुलांना बाहेर काढले असता, या मुलांनी डोळा चुकवून तिथून पोबारा केला.
अजय बुवा
मेरशी येथील अपना घरातून फोंड्यातील एका आश्रमात पाठविण्यात आलेल्या चार अल्पवयीन मुलांनी केवळ एक दिवस त्या आश्रमात राहिल्यानंतर तिथून फळ काढला असून, याप्रकरणी फोंडा पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तानुसार रेल्वे स्थानकावर फिरत असल्या प्रकरणी सदर चार मुलांना रेल्वे पोलिसांनी पकडून अपणा घरमध्ये ठेवले होते. कसल्याही गुन्ह्यात ह्या मुलांचा सहभाग नाही .केवळ सुरक्षे करता व प्रशासकीय तांत्रिक बाबीसाठी त्यांना अपना घर मध्ये ठेवण्यात आले होते. 31 मार्च रोजी अपना घर मधून सदर मुलांना फोंड्यातील एका आश्रमात ठेवण्यात आले होते. तिथे एक दिवस राहिल्यानंतर त्याने संपूर्ण आश्रमाची पाहणी केली.
एक एप्रिल रोजी सकाळी योगाच्या निमित्ताने मुलांना बाहेर काढले असता, या मुलांनी डोळा चुकवून तिथून पोबारा केला. पळून गेलेल्या चार जणांपैकी तिघे चंदीगडचे असून एक जण केरळ राज्यातील आहे. सर्वात मोठा मुलगा हा सोळा वर्षाचा तर सर्वात लहान 13 वर्षाचा आहे. सदर मुले पळून गेल्याचे लक्षात येताच आश्रमाच्या व्यवस्थापनाने फोंडा पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली असून अजून पर्यंत तरी या मुलांचा थांग पत्ता लागलेला नाही. पोलिसांनी चारही मुलांचा मागमूस काढण्यासाठी जाळे विणले असून ही मुले पुन्हा ताब्यात येतील अशी आशा व्यक्त केली आहे.