बोंबला! दिल्लीला जात असलेल्या विमानात प्रवाशाचा धिंगाणा, क्रू मेंबरसोबत भांडताना काढले सर्व कपडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 09:38 AM2021-04-09T09:38:47+5:302021-04-09T09:39:56+5:30
फ्लाइटमध्ये प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने एएनआयला सांगितले की, 'सर्वातआधी प्रवाशाने लाइफ जॅकेटवरून क्रू मेंबरसोबत वाद सुरू केला.
बंगळुरूहून दिल्लीला जात असलेल्या एअर एशिया फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने फारच गैरवर्तन केलं आणि विमानात प्रवासादरम्यान क्रू मेंबरसोबत झालेल्या वादानंतर आपले सर्व कपडे काढले. ही घटना मंगळवारी एअर एशियाच्या फ्लाइट नंबर I5-722 मध्ये घडली.
फ्लाइटमध्ये प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने एएनआयला सांगितले की, 'सर्वातआधी प्रवाशाने लाइफ जॅकेटवरून क्रू मेंबरसोबत वाद सुरू केला आणि अपशब्द वापरु लागला होता. त्यानंतर फ्लाइटमध्ये स्टाफने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण अशातच त्याने त्याचे त्याचे कपडे काढणे सुरू केले. एक एक करून त्याने सर्व कपडे काढले आणि तो नग्न झाला. एअर एशिया इंडियाच्या प्रवक्त्यांनी या घटनेला दुरोजा दिला आणि सांगितले की, ६ एप्रिलला बंगळुरूहून नवी दिल्ली येत असलेल्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने गैरवर्तन केलं होतं.
एअर एशियाच्या क्रू मेंबरने फ्लाइटमधील इतर प्रवाशांच्या मदतीने स्थितीवर कंट्रोल मिळवला आणि याची माहिती पायलटला दिली. यानंतर पायलटने हे प्रकरण गंभीरतेने घेत दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलरला संपर्क करून याची माहिती दिली आणि त्यानंतर त्यांना लवकरच लॅंडींगची परवानगी मिळाली. लॅंडींग केल्यावर त्या व्यक्तीला लगेच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
एअरलाइनच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'ही घटना दिल्ली एअरपोर्टववर लॅंडींग दरम्यान समोर आली आहे. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. एअर एशिया इंडियाने डिसरप्टिव पॅंसेंजर हॅंडलिंग पॉलिसीनुसार विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाई केली. आम्ही नेहमीच प्रवाशी आणि चालक दलाच्या सुरक्षेसाठी काम केलंय. अशा घटनांची आम्ही निंदा करतो'.
दिल्ली पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कृत्यासाठी एअरलाइन या प्रवाशाला नो फ्लाय लिस्टमध्ये टाकू शकते. मात्र, घटनेची चौकशी अजून सुरू आहे आणि प्रवाशांशी संबंधित कायद्यानुसार या व्यक्तीवर कारवाई केली जाणार.