पाटीपुरा येथे  ‘आलू’ने केले ‘उघड्या’वर चाकूचे सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:04 PM2021-07-06T22:04:02+5:302021-07-06T22:04:41+5:30

Murder News :खुनाची तिसरी घटना : यवतमाळसह ग्रामीणमध्ये सत्र 

At Patipura, 'Aloo' had stabbed on 'Ughadya' with a knife | पाटीपुरा येथे  ‘आलू’ने केले ‘उघड्या’वर चाकूचे सपासप वार

पाटीपुरा येथे  ‘आलू’ने केले ‘उघड्या’वर चाकूचे सपासप वार

Next
ठळक मुद्देपोलीस तपासात आलू उर्फ समीर खानने उघड्या उर्फ प्रशांत याच्यावर चाकूने वार केल्याचे पुढे आले. 

यवतमाळ : येथील पाटीपुरा भागातील क्रांतिसूर्य चाैकात दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन मारेकऱ्यांनी युवकाचा चाकूने भाेसकून खून केला. ही घटना साेमवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. घारफळ, मनपूरनंतर यवतमाळ उपविभागातील हा सलग तिसरा खून  आहे. पोलीस तपासात आलू उर्फ समीर खानने उघड्या उर्फ प्रशांत याच्यावर चाकूने वार केल्याचे पुढे आले. 


उघड्या ऊर्फ प्रशांत अंकुश पाईकराव (३६) रा.  आंबेडकर नगर पाटीपुरा असे मृताचे नाव आहे. उघड्या हा त्याचा मित्र मंगेश गुजाबराव नंदपटेल याच्या साेबत क्रांतिसूर्य चाैकात बसून हाेता. तेवढ्यात एकाच दुचाकीवरून तिघे जण आले़  त्यांनी उघड्याला शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने हल्ला केला. जीवाच्या भीतीने मंगेश नंदपटले याने घराकडे धुम ठाेकली. उघड्याला शासकीय रुग्णालयात डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. शहर पाेलिसांनी साेमवारी रात्रीच धरपकड सुरू केली. आलू उर्फ समीर खान जमीर खान याला ताब्यात घेतले.  मंगेश नंदपटले याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. 

पाेलिसांची गस्त घटल्याचा परिणाम 
पाटीपुरा परिसरात मध्यंतरी सातत्याने खुनाच्या घटना घडत हाेत्या. तेव्हापासून परिसरातील अंतर्गत भागात पाेलिसांची सातत्याने गस्त हाेती़; परंतु गेल्या काही दिवसांपासून ही गस्त बंद आहे. त्यामुळे पाटीपुरा परिसरात चाैकाचाैकामध्ये रात्रीच्यावेळेस गर्दी जमलेली असते़  येथे नशेच्या आहारी असलेले टाेळके शुल्लक कारणावरून वाद घालत थेट धारदार शस्त्राने वार करतात. पाेलिसांनी पूर्वीसारखी गस्त कायम ठेवावी, अशी मागणी हाेत आहे़.

Web Title: At Patipura, 'Aloo' had stabbed on 'Ughadya' with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.