सत्संगमध्ये भेट, नंतर बलात्कार, तरुण ४ तासांच्या पॅरोलवर आला, लग्नानंतर तुरुंगात गेला, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:29 PM2023-03-25T13:29:51+5:302023-03-25T13:31:48+5:30
तुरुंगात शिक्षा भोगणारा एक गुन्हेगार चार तासांच्या पॅरोवर बाहेर येतो आणि एका तरुणीसोबत मंदिरात लग्न करतो.
तुरुंगात शिक्षा भोगणारा एक गुन्हेगार चार तासांच्या पॅरोवर बाहेर येतो आणि एका तरुणीसोबत मंदिरात लग्न करतो. पुन्हा तुरुंगात जातो. हे अनोखे लग्न बिहारमध्ये झाले. तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराने पॅरोलवर येऊन लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. ज्या तरुणीच्या आरोपामुळे शिक्षा भोगावी लागली त्याच तरुणीशी लग्न केल्याचे समोर आले आहे.
पश्चिम चंपारणच्या बगाहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माछरगाव गावचा रहिवासी राहुल कुमार हाजीपूरमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. राहुल लखनऊमध्ये एका सत्संगासाठी कुटुंबासोबत गेला होता. यावेळी त्याची भेट एका २१ वर्षीय तरुणीसोबत होते, या भेटीचे रुपांतर काही दिवसांनी मैत्रीत होते आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते.
मेहुणीचं अपहरण करून तीन महिने केला रेप, मग पत्नी आणि मेहुणीला पाजलं विष
यानंतर तरुण आणि तरुणी दोघेही गोपालगंज येथील थावे दुर्गा मंदिरात आले आणि गुपचूप लग्न करून पती-पत्नी म्हणून राहू लागले, पण अचानक ५ मार्च रोजी मुलीची प्रकृती खालावली. यावेळी तरुणीला प्रियकर राहुल कुमार याने रुग्णालयात दाखल केले, यावेळी पोलिसांनी तरुणीने केलेल्या आरोपानंतर तरुणाविरोधात बलात्काराच्या गुन्ह्याखाली राहुल कुमारला अटक करून तुरुंगात पाठवले.
दोघांच्याही कुटुंबीयांना हा प्रकार कळला. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी तरुण आणि तरुणीचे लग्न लावून देण्यास होकार दिला. गोपालगंजच्या सीजेएम न्यायालयात कुटुंबाच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला होता. दोघेही प्रौढ असल्याचे आढळून आल्याने न्यायालयाने दोघांनाही लग्न करण्याची परवानगी दिली.त्यासाठी तरुणाने कोर्टाकडून चार तासांचा पॅरोल मिळवला. लग्नाचे प्रमाणपत्र सादर करुन आता राहुल कुमारच्या सुटकेसाठी अपील करणार आहे, ठावे दुर्गा मंदिरात पार पडलेल्या या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा आहे.