ड्रायव्हर दीड कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन फरार, पैशांनी भरलेली कॅश व्हॅन घेऊन गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 12:54 PM2023-04-11T12:54:35+5:302023-04-11T12:54:51+5:30

Crime News : जसे कंपनीचे कर्मचारी व्हॅनमधून उतरले, तसा ड्रायव्हर सूरज कुमार कॅशने भरलेली गाडी घेऊन फरार झाला. कर्मचाऱ्यांनी लगेच याची सूचना पोलिसांना दिली.

Patna driver of cash van absconded with crore rupees icici bank atm loot | ड्रायव्हर दीड कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन फरार, पैशांनी भरलेली कॅश व्हॅन घेऊन गायब

ड्रायव्हर दीड कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन फरार, पैशांनी भरलेली कॅश व्हॅन घेऊन गायब

googlenewsNext

Crime News :  बिहारच्या पटणामध्ये एका प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीच्या कॅश व्हॅनमधील दीड कोटी रूपये घेऊन पसार झाला. व्हॅन ड्रायव्हर सूरज कुमारवर चोरीचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डंका इमली भागातील आहे. सोमवारी कॅश व्हॅन सिक्योर व्हॅल्यूची व्हॅन आयसीआयसीआय बॅंकेच्या एटीएममध्ये कॅश जमा करण्यासाठी पोहोचली होती. 

जसे कंपनीचे कर्मचारी व्हॅनमधून उतरले, तसा ड्रायव्हर सूरज कुमार कॅशने भरलेली गाडी घेऊन फरार झाला. कर्मचाऱ्यांनी लगेच याची सूचना पोलिसांना दिली. ज्यानंतर पोलिसांनी ड्रायव्हरचा शोध सुरू केला. पोलिसांनी व्हॅन नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलजवळ उभी सापडली.

पण व्हॅनमधील सगळी कॅश गायब होती आणि ड्रायव्हर सूरज कुमार सुद्धा फरार होता. हातोड्याने लॉकर तोडून कॅश काढण्यात आली. पोलीस अजूनही सूरज कुमारचा शोध घेत आहेत.

सिक्योर व्हॅल्यू कॅश कंपनीचे ऑडिटर रवि राय यांच्यानुसार, कंपनीचे तीन कर्मचारी ड्रायव्हरसोबत आयसीआयसीआय बॅंकेच्या एटीएममध्ये कॅश जमा करण्यासाठी गेले होते. ड्रायव्हरने कर्मचाऱ्यांना चमका दिला आणि व्हॅन घेऊन पसार झाला. कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांचीही चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी सांगितलं की, ड्रायव्हरचा शोध घेण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. सोबतच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही चेक केलं जात आहे. सोबतही हेही तपासलं जात आहे की, या दरोड्यामध्ये आणखीही कुणाचा हात आहे का.

Web Title: Patna driver of cash van absconded with crore rupees icici bank atm loot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.