एकमेकींच्या प्रेमात पडल्या दोन तरूणी, परिवाराच्या विरोधामुळे केली पोलिसांकडे सुरक्षेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 13:28 IST2022-05-06T13:26:55+5:302022-05-06T13:28:00+5:30
Patna : गुरूवारी रात्री उशीरा पटणा एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लो यांच्या घरी दोन तरूणी घाबरलेल्या अवस्थेत पोहोचल्या आणि त्यांनी एसएसपींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

एकमेकींच्या प्रेमात पडल्या दोन तरूणी, परिवाराच्या विरोधामुळे केली पोलिसांकडे सुरक्षेची मागणी
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतही देशात लोक समलैंगितेचा स्वीकार करताना दिसत नाहीत. अशीच एक ताजी घटना पटणामधून (Patna) समोर आली आहे. इथे दोन तरूणी एकमेकींच्या प्रेमात पडल्या (Lesbian Girls) आहेत. पण हे प्रेम मिळवण्यासाठी त्या समाजाशी लढत आहेत आणि आपल्या सुरक्षेची मागणी करत आहेत. दोघींनी पटणातील एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लो यांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी केली.
गुरूवारी रात्री उशीरा पटणा एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लो यांच्या घरी दोन तरूणी घाबरलेल्या अवस्थेत पोहोचल्या आणि त्यांनी एसएसपींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्या तरूणींची समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांना महिला पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलं. इथे त्यांनी सगळं प्रकरण सांगितलं. दोघींचं म्हणणं ऐकून घेतल्यावर पोलिसांनी त्यांना सुरक्षेचं आश्वासन दिलं.
पटणाच्या इंद्रपुरीमध्ये राहणारी तनिष्क श्री आणि श्रेया नावाच्या तरूणी एकमेकींच्या प्रेमात आहेत. पण तनिष्कचा परिवार दोघींना एकत्र राहू देत नाहीयेत. दोघींची मैत्री ५ वर्ष जुनी आहे. तनिष्क श्री म्हणाली की, त्यांचे परिवारवाले मुद्दामहून अपहरणाची केस करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
तनिष्क श्री म्हणाली की, मी वयस्क आहे. त्यामुळे आम्हाला सोबत राहण्याचा अधिकार आहे. सध्या पोलिसांनी दोघींची समस्या ऐकून त्यांना आश्वासन दिलं. पोलिसांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही.