प्रेमी युगुल करणार होतं लग्न, तेव्हा तरूणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या सनकीची झाली एन्ट्री आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:55 PM2022-03-10T12:55:20+5:302022-03-10T12:56:25+5:30
Bihar Crime News : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पटणातील दानापूरमध्ये एक प्रेमी युगुल ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं.
बिहारची (Bihar) राजधानी पटणामधून एक हैराण करणारी घटन समोर आली आहे. इथे गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रेमी युगुलासमोर मोठी समस्या निर्माण झाली. तरूणीवर एकतर्फी प्रेम करणारा माथेफिरूने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली. यानंतर प्रेमी युगुलाच्या लग्नात अडचण निर्माण झाली. प्रकरण इतकं वाढलं की, प्रेमी युगुलाच्या लग्नात पोलीस तैनात करावे लागले आणि पोलिसांच्या संरक्षणात त्यांचं लग्न लावून देण्यात आलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पटणातील दानापूरमध्ये एक प्रेमी युगुल ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. दोघेही लकरच लग्न करून आयुष्यभरासाठी एकत्र येणार होते. पण या दोघांच्या आयुष्यात एका व्हिलनी एन्ट्री झाली. हा व्हिलन तरूणीवर एकतर्फी प्रेम करणारा एक सनकी होता. त्यानंतर प्रेमी युगुलाच्या आयुष्यात सगळं विस्कळीत होऊ लागलं होतं.
सनकी व्यक्तीची दहशत इतकी होती की, प्रेमी युगुल त्याला हैराण झाले होते. जेव्हा दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली तेव्हा त्याच्या भीतीमुळे पोलिसांकडे सुरक्षा मागावी लागली. यानंतर पोलीस संरक्षणात एका मंदिरात प्रेमी युगुलाचं लग्न लावण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, सनकी व्यक्ती तरूणीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे दोघेही घाबरलेले होते.
पोलिसांनुसार, माथेफिरू व्यक्तीने तरूणीच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यासोबतच तरूणीच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी १०० नंबर डायल करून त्यांच्याकडे दारू असल्याची माहिती देत होता. तो पोलिसांना सांगत होता की, तरूणीच्या घरात मोठ्या प्रमाणात दारू आहे. यामुळे तरूणी आणि कुटुंबिय घाबरलेले होते.
पोलिसांनी सांगितलं की, तरूणी गेल्या ७ वर्षापासून एका तरूणावर प्रेम करत होती आणि त्याच्यासोबतच ती लग्न करणार होती. पण तरूणींचं लग्न होऊ शकत नव्हतं कारण तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा सनकी व्यक्ती तिच्या मागे लागला होता. तो तिला त्रास देत होता. यानंतर प्रेमी युगुलाने पोलिसांकडे मदत मागितली. दोघांनाही पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं आणि मग त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. तसेच सनकी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.