"CCTV कॅमेरा बंद करून सुजित मारतो... पप्पा, मला इथून घेऊन चला"; SDM च्या मुलाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:04 AM2023-01-14T11:04:55+5:302023-01-14T11:11:04+5:30
अधिकाऱ्याने डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचार्यांनी त्यांच्या मुलावर हल्ला करून खून केल्याचा आरोप केला आहे.
पाटणाचे वरिष्ठ उपजिल्हाधिकारी सूरज कुमार सिन्हा यांचा 16 वर्षीय मुलगा आयुष याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. हा मृत्यू नैसर्गिक होता की त्याची हत्या करण्यात आली, असा संशय कायम आहे. आयुषचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहे. मानस हॉस्पिटल, मौर्य विहार, फुलवारी शरीफ येथे असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचारादरम्यान संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.
अधिकाऱ्याने डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचार्यांनी त्यांच्या मुलावर हल्ला करून खून केल्याचा आरोप केला आहे. मृत आयुषची आई निर्मला देखील सांगतात की, रुग्णालयातच काहीतरी केले गेले आहे, ज्यामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पाटणा विभागीय आयुक्तालयात नियुक्त एडीएम सूरज कुमार सिन्हा यांनी लेखी अर्जात म्हटले आहे की, 21 डिसेंबर रोजी मौर्य बिहार कॉलनी रोड नं. येथे असलेल्या मानस हॉस्पिटलमध्ये अमली पदार्थांचे व्यसन असलेल्या 16 वर्षीय मुलगा आयुष कुमारला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
25 डिसेंबरला मी माझ्या मुलाला भेटायला गेलो तेव्हा मला त्याला भेटू दिले नाही. 4 जानेवारी रोजी पुन्हा मुलाला भेटायला गेले असता सुजित नावाच्या कर्मचाऱ्याने 22 आणि 29 डिसेंबर रोजी आपल्यावर प्राणघातक हल्ला करून जबडा आणि पोटाला दुखापत केल्याची तक्रार मुलाने केली. मुलाच्या म्हणण्याच्या आधारावर हॉस्पिटलमधील लोकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. पप्पा मला येथून घेऊन जा, असेही मुलाने सांगितले होते. या विषयावर मला डॉ. संतोष यांच्याशी बोलायचे झाले असता त्यांनी फोन घेतला नाही.
अधिकारी म्हणाले की, 12 जानेवारीला डॉक्टर संतोष कुमार यांनी फोन केला की तुमच्या मुलाची प्रकृती खराब आहे. त्याचे बीपी आणि पल्स खूपच कमी आहे. यानंतर आम्हाला त्याला एम्स रुग्णालयात दाखल करत असल्याचं सांगितलं. एम्समधील सीटीव्हीएस विभागाच्या वॉर्ड आयसीयूच्या व्हेंटिलेटरवर मुलगा दिसला. सीपीआर दिल्यानंतर रुग्णाला एम्समध्ये आणण्यात आल्याचे तेथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत आयुषच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"