संतापजनक! भांडी न धुतल्याने शिक्षिकेने विद्यार्थिनीला केली बेदम मारहाण, दाबला गळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 04:21 PM2023-01-13T16:21:43+5:302023-01-13T16:32:53+5:30

एका शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची भयंकर घटना घडली आहे.

pauri garwal teacher thrashed girl student badly for not washing utensils video viral on social media | संतापजनक! भांडी न धुतल्याने शिक्षिकेने विद्यार्थिनीला केली बेदम मारहाण, दाबला गळा

फोटो - झी न्यूज

Next

उत्तराखंडमधील पौडी-गढवालमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. जिथे एका शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नंतर मुलीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ वर्गातील अन्य एका विद्यार्थिनीने तिच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. ज्यामध्ये शिक्षिका विद्यार्थिनीला बेदम मारहाण करताना दिसत आहे.

पौडी जिल्ह्यात एका विद्यार्थिनीला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओची पुष्टी करताना शिक्षण विभागाने पौरी जिल्ह्यातील देवला पौखाल भागाची माहिती दिली आहे. गुरु राम राय इंटर कॉलेजमध्ये एनएसएस कॅम्प आयोजित करण्यात आला होता. याच दरम्यान, एका विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षिकेने बेदम मारहाण केली.

भांडी न धुतल्याने विद्यार्थिनीला मारहाण

शिक्षिकेने आधी विद्यार्थिनीला सुमारे पाच वेळा थप्पड मारली आणि नंतर तिचा गळा दाबला. मिळालेल्या माहितीनुसार, पाणी नसताना विद्यार्थिनीने तिची उष्टी भांडी न धुतल्यामुळे शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने विद्यार्थिनीला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

शिक्षिकेपासून कसातरी जीव वाचवून विद्यार्थिनीने तेथून पळ काढला. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी आरोपी शिक्षिकेवर कारवाई करण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: pauri garwal teacher thrashed girl student badly for not washing utensils video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.