धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 04:14 PM2020-08-29T16:14:06+5:302020-08-29T16:28:04+5:30
तेलंगानाच्या हुजूरबाद येथे राहणार्या कनकम्मा या महिलेने बरेच कर्ज घेतले होते.
हैदराबाद : तेलंगणमधील हजुरबादमध्ये एका आजीने आपले कर्ज फेडण्यासाठी अवघ्या एका महिन्याच्या मुलीला एक लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यावेळी मुलीच्या आईने याबाबत विचारले असता या आजीने सांगितले की, "मुलगी गायब झाली असून कोठे सापडत नाही."
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगानाच्या हुजूरबाद येथे राहणार्या कनकम्मा या महिलेने बरेच कर्ज घेतले होते. दरम्यान, कनकम्माची मुलगी तिच्या घरी राहायला आली होती. चार वर्षांपूर्वी कणकम्माची मुलगी पद्मा हिने रमेश यांच्यासोबत लग्न केले होते. महिनाभरापूर्वी पद्माला हैदराबादमध्ये मुलगी होती. ज्यावेळी पद्मा आपल्या मुलीसह आई कनकम्माच्या घरी पोहोचली, त्यावेळी तिला पाहून खूप आनंद झाला. मात्र, यादरम्यान कनकम्माच्या मनात काय खिचडी शिजत होती, हे कोणालाही कळले नाही.
चार दिवसांपूर्वी कनकम्मा पद्माच्या मुलीला घेऊन बाहेर गेली. त्यानंतर तिने मुलीला पेडापल्ली जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या कुटुंबाला विकले. यासाठी या कुटुंबीयांनी कनकम्माला एक लाख 10 हजार रुपयेही दिले. घरी आल्यानंतर कनकम्माने मुलगी गायब झाल्याचे नाटक सुरू केले. त्यानंतर बरीच चौकशी पद्माने आपली आई कनकम्मावर संशय घेत पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी तपास केला असता कनकम्माने सर्व सत्य सांगितले. तपासादरम्यान, असे समजले की पद्माची आई आपल्या मुलीच्या लव्ह मॅरेजमुळे खूश नव्हती आणि तिच्यावर बरेच कर्ज होते. यानंतर तिने संधी पाहून नवजात मुलाला विकण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आरोपी कनकन्नाला अटक केली आहे.
आणखी बातम्या...
- अॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर
- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा
- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार
- CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...
- आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार