पायल तडवी आत्महत्या प्रकरण: जामिनासाठी घातलेल्या अटी शिथिल करण्यासाठी डॉक्टरांची उच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 06:07 IST2019-12-11T03:55:16+5:302019-12-11T06:07:24+5:30
तिघींनाही न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई न सोडण्याची अट घालण्यात आली आहे.

पायल तडवी आत्महत्या प्रकरण: जामिनासाठी घातलेल्या अटी शिथिल करण्यासाठी डॉक्टरांची उच्च न्यायालयात धाव
मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तीन डॉक्टर आरोपींची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने घातलेल्या अटी शिथिल करण्यात याव्यात, यासाठी या तिन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हेमा अहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल यांनी त्यांची जामिनावर सुटका करताना उच्च न्यायालयाने तीन कठोर अटी घातल्या या अटी शिथिल करण्यासाठी या तिघींनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या तिघींनाही न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई न सोडण्याची अट घालण्यात आली आहे. त्याशिवाय नागपाडा गुन्हे अन्वेषण विभागाला एक दिवसाआड भेट द्यावी व नायर रुग्णालयाच्या आवारात पाऊल ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. या तीन अटी शिथिल करण्यासाठी या तिघींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.