करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 05:42 PM2020-09-18T17:42:48+5:302020-09-18T17:43:14+5:30
Sushant Singh Rajput Case : राहिलने एनसीबीला ज्याच्यासाठी तो काम करत असे त्याविषयी माहिती दिली आहे. आता एनसीबी या ड्रग्जच्या साखळीचा मुख्य आरोपी शोधत आहे.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील रियाच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीला (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) मोठे यश मिळाले आहे. एनसीबीने बॉलिवूडमध्ये ड्रग्स पुरवठा करणार्या मोठ्या ड्रग पेडलरला पकडले आहे. राहिल विश्राम असे या आरोपीचे नाव आहे. सूत्रांकडून अशी बातमी समोर आली आहे की, राहिलचा बॉलिवूड सेलिब्रिटीशी थेट संबंध आहे. काल दुपारपासून आज पहाटेपर्यंत एनसीबीने छापेमारी करून रहिलला पकडले. राहिलकडून एनसीबीने जवळपास 3 ते 4 कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. तसेच साडेचार लाखांची रोकडही हस्तगत केली आहे. सुरुवातीच्या चौकशीत राहिल म्हणाला की, तो बॉलीवूडमध्ये ड्रग्स पुरवठा करण्याच्या मोठ्या नेटवर्कचा एक भाग आहे. राहिलने एनसीबीला ज्याच्यासाठी तो काम करत असे त्याविषयी माहिती दिली आहे. आता एनसीबी या ड्रग्जच्या साखळीचा मुख्य आरोपी शोधत आहे.
अटकेत असलेल्या राहिल या ड्रग्ज पेडलरचे रीया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीशी खास संबंध आहे. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या एनसीबीने एका ऑपरेशनमध्ये बॉलिवूडला पुरवठा करणाऱ्या या व्यक्तीला पकडले. एनसीबी राहिलने दिलेल्या माहितीप्रमाणे तपास करीत आहे, जेणेकरून त्याचा म्होरक्या पकडला जाऊ शकेल. जर राहिलच्या म्होरक्याला पकडले तर बॉलिवूड ड्रग सप्लाय करणारी साखळी समोर येईल आणि ती तोडण्यात तपास यंत्रणेला यश मिळू शकते.
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा https://t.co/yAJjKr2bzd
— Lokmat (@MiLOKMAT) September 18, 2020
एनसीबीने ड्रग्जच्या तीन वेगवेगळ्या सिंडिकेट्सचा भांडाफोड करुन ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लाख रुपये किंमतीचे ड्रग्ज आणि चार लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यातील सर्वात मोठे नाव राहिल विश्राम आहे. त्याचे थेट संबंध बॉलिवूडशी असल्याचे सांगितले जात आहेत. मुंबई एनसीबी व्यतिरिक्त इतर शहरांतील एनसीबीच्या अतिरिक्त पथकांनाही मुंबईत बोलावण्यात आले आहे.एनसीबीची एक टीम गुरुवारी अहमदाबादहून मुंबईला पोहोचली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एनसीबीने रिया आणि शोविकसह २० जणांना अटक केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा