कारच्या धडकेत पादचारी महिलेचा जागीच मृत्यू; महामार्गावरील कुरणखेड बस थांब्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 07:58 PM2021-03-12T19:58:59+5:302021-03-12T19:59:36+5:30

Accident : काटेपुर्णा खर्डा भिमनगर येथील फुलमा भानुदास मोहड वय ३० वर्ष व इतर चार महिला सकाळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या होत्या.

Pedestrian woman killed in car crash; Incident at Kurankhed bus stand on the highway | कारच्या धडकेत पादचारी महिलेचा जागीच मृत्यू; महामार्गावरील कुरणखेड बस थांब्यावरील घटना

कारच्या धडकेत पादचारी महिलेचा जागीच मृत्यू; महामार्गावरील कुरणखेड बस थांब्यावरील घटना

Next
ठळक मुद्देअपघातानंतर सदर कार मधील चालका सह अन्य पसार झाले, दरम्यान अपघातानंतर सदर कार रोडच्या कडेला पलटी झाली.

राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काटेपुर्णा बस थांब्या नजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या  कार गाडीने एका ३० वर्षिय पादचारी महिलेस उडविल्याची घटना शुक्रवारी १२ मार्च रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान घडली या अपघातात सदर पादचारी महिलेचा मृत्यू झाला,फुलामा मोहड असे मृत महिलेचे नाव आहे. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काटेपुर्णा खर्डा भिमनगर येथील फुलमा भानुदास मोहड वय ३० वर्ष व इतर चार महिला सकाळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या होत्या. दरम्यान शेतातील काम आटोपून आपल्या घरी परत येत असताना बस थांब्या नजीक मुर्तीजापुर कडून अकोला कडे जाणारी कार  गाडी क्रमांक एम एच १२ जी.सी.६१५७  या कारने पादचारी महीला फुलामा मोहड आपल्या शेतातील काम आटोपून घरी परत जात असताना जोरदार धडक दिली या अपघातात सदर पादचारी महीला गंभीर जखमी झाली व घटनास्थळी मृत्यू झाला, दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके, ए एस आय सतिष सपकाळ, नामदेव केंद्रे सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुर्तीजापुर येथील रुग्णालयात पाठविण्यात आला, दरम्यान अपघातानंतर सदर कार मधील चालका सह अन्य पसार झाले, दरम्यान अपघातानंतर सदर कार रोडच्या कडेला पलटी झाली,  पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके सह पोलीस करत आहेत. 

Web Title: Pedestrian woman killed in car crash; Incident at Kurankhed bus stand on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.