तुफान दगडफेक, वाहनही फोडले; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 08:17 PM2021-05-03T20:17:42+5:302021-05-03T20:18:44+5:30

Crime News : रामटेकेनगर टोली भागात तणाव

The pelted stones, vandalised vehicle; Criminal attack on police who went for legal action | तुफान दगडफेक, वाहनही फोडले; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांचा हल्ला

तुफान दगडफेक, वाहनही फोडले; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांचा हल्ला

ठळक मुद्देरहाटे टोली, रामटेके नगर भागात असलेल्या एका झोपडपट्टीत जागोजागी हातभट्टीची दारू गाळली जाते. या भागात मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डेही चालतात.

नागपूर : गावठी दारूच्या भट्या आणि जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुन्हेगारांनी हल्ला चढवला. तुफान दगडफेक करून त्यांच्या वाहनाची तोडफोड  केली. सोमवारी सायंकाळी रामटेकेनगर टोली भागात ही घटना घडली.


रहाटे टोली, रामटेके नगर भागात असलेल्या एका झोपडपट्टीत जागोजागी हातभट्टीची दारू गाळली जाते. या भागात मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डेही चालतात. पोलीस त्या ठिकाणी वारंवार कारवाई करतात. मात्र त्याला न जुमानता हे गुन्हेगार पुन्हा काही दिवसांनी दारूच्या भट्ट्या आणि जुगार अड्डे सुरू करतात. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास पोलिसांचे पथक तिकडे कारवाईसाठी गेले. पोलिस कारवाई करीत असल्याचे बघून गुन्हेगारांनी महिलां - मुलांना पुढे केले. त्यांच्या आडून त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला.

तुफान दगडफेक करून वाहनांचीही तोडफोड केली. मोठ्या संख्येत गुन्हेगारांनी धाव घेतल्यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली. त्यांनी नियंत्रण कक्षाला  माहिती देऊन घटनास्थळी पोलिस ताफा मागवून घेतला. वरिष्ठांनाही कळविले. पोलिसांवर हल्ला झाल्याचे कळताच वरिष्ठांसह मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा तिकडे धावला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरोपींची धरपकड सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर पाच आरोपींना पोलिस ठाण्यात आणून बसविण्यात आले होते. त्यांच्याकडून उर्वरित आरोपींची नावे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात होता.

Web Title: The pelted stones, vandalised vehicle; Criminal attack on police who went for legal action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.