पेण बलात्कार, हत्या प्रकरण : आरोपीवर दोष सिद्धता, फाशी की जन्मठेप फैसला सोमवारी

By राजेश भोस्तेकर | Published: December 14, 2023 01:29 PM2023-12-14T13:29:37+5:302023-12-14T13:30:07+5:30

उज्वल निकम यांनी आरोपीला फाशीची शिक्षेची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

Pen rape, murder case: Accused convicted, sentenced to death or life imprisonment on Monday | पेण बलात्कार, हत्या प्रकरण : आरोपीवर दोष सिद्धता, फाशी की जन्मठेप फैसला सोमवारी

पेण बलात्कार, हत्या प्रकरण : आरोपीवर दोष सिद्धता, फाशी की जन्मठेप फैसला सोमवारी

अलिबाग : पेण शहरातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची घटना २० डिसेंबर २०२० साली घडली होती. याबाबत अलिबाग जिल्हा न्यायालयात तीन वर्षापासून खटला सुरू आहे. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या खटल्यातील आरोपी आदेश पाटील यांच्यावर दोष सिद्धता न्यायलयाने केली असून सोमवारी १८ डिसेंबर रोजी जन्मठेप की फाशी याचा फैसला होणार आहे. अशी माहिती खटल्यातील विशेष सरकारी वकील अॅड उज्वल निकम यांनी दिली आहे. उज्वल निकम यांनी आरोपीला फाशीची शिक्षेची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.  जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपी आदेश पाटील याला अटक केली. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबाग येथे एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो घरी आला असता त्याने हे कृत्य केले. पेण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी मागणी केली होती. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम याची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी हे सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.

जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर याच्या न्यायलायात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला आहे. गुरुवारी १४ डिसेंबर रोजी खटल्याच्या सुनावणी साठी उज्वल निकम हे उपस्थित होते. जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर यांनी खटल्यातील आरोपी हा दोषी असल्याचे म्हटले आहे. उज्वल निकम यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आरोपीवर आधीच नऊ गुन्हे दाखल असून समाजात वावरण्यास पात्र नाही. असा युक्तिवाद निकम यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी सोमवारी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आरोपीला फाशी ही जन्मठेप याचा फैसला सोमवारी होणार आहे. या निकालाकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Pen rape, murder case: Accused convicted, sentenced to death or life imprisonment on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.