बोंबला! शिपायाला बँकेत कॅशिअर केले, 100 कोटींचा चुना लावला अन् कुटुंबासह पसार झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 12:21 PM2021-09-29T12:21:04+5:302021-09-29T12:21:50+5:30
Bank Fraud By Cashier: धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्याचा सूत्रधार हा कॅशिअर पाराशर हा आहे. तो याच बँकेत शिपाई होता, त्याला कॅशिअर बनविण्यात आले होते. त्यानेच एवढा मोठा घोटाळा केला आहे.
एकीकडे विविध बँका, आर्थिक संस्थांमध्ये घोटाळे उघड होत असताना मध्य प्रदेशच्या शिवपुरी सहकारी बँकेत १०३ कोटींचा घोटाळा समोर आला आहे. या पैकी अधिकांश रक्कम ही नटवरलाल राकेश पाराशर ने गायब केली आहे. उर्वरित रकमेचा घोटाळा उघड करण्यासाठी चौकशी सुरु झाली आहे. (peon became cashier in shivpuri cooperative bank did scam of 100 crores and fled)
धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्याचा सूत्रधार हा कॅशिअर पाराशर हा आहे. तो याच बँकेत शिपाई होता, त्याला कॅशिअर बनविण्यात आले होते. त्यानेच एवढा मोठा घोटाळा केला आहे. सहकारी बँकेमध्ये अफरातफर केल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर भोपाळमध्ये १३ सदस्यांची समिती चौकशी करत आहे. आतापर्यंत तीन आरोपींकडूने 5 कोटी 31 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अद्याप सर्व घोटाळा बाहेर आलेला नाही. या घोटाळ्याची व्याप्ती वाढू लागली आहे.
आता पर्यंत शिवपूरी जिल्ह्यातील तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून पाराशरसह अन्य घोटाळेबाज कुटुंबीयांसह बेपत्ता झाले आहेत. घोटाळ्याचा मास्टरमाईंड राकेश पराशरला पकडणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. कारण तो कुटुंबासह घरातून गायब झाला आहे. त्याच्या अटकेनंतरच या मोठ्या घोटाळ्याचे धागेदोरे उघड होतील. तो दुसऱ्या राज्यात गेल्याचे बोलले जात आहे.
राकेश गायब असला तरी त्याचे जिल्हाभरात पसरलेले उद्योग व्यवसाय आजही सुरु आहेत. हे पैसे त्याने व्यवसायांमध्ये लावले असण्याची शक्यता आहे. त्यातून येणारा पैसा पराशरच्या खात्यात त्याचा नोकर जमा करतो. पराशरच्या मुलाची गाडी काही दिवसांपूर्वी मथुरा ते वृंदावन रस्त्यावर बंद पडली होती. तेव्हा त्याच्याकडे दुरुस्तीचे पैसे कमी पडले. तर त्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने त्याच्या खात्यात २०००० हजार रुपये भरले. पोलीस अद्याप या लोकांची कॉल डिटेल्स तपासू न शकल्याने तपास अडकला आहे.