पुलावरून वैनगंगा नदीपात्रात उडी घेवून चपराश्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 21:44 IST2021-09-01T21:44:11+5:302021-09-01T21:44:52+5:30
Suicide Case :बुधवारी सकाळी शाळेत जात असल्याचे सांगून ताे निघून गेला हाेता. नगरसेवक सुधीर खाेब्रागडे यांचा ताे भाऊ हाेता.

पुलावरून वैनगंगा नदीपात्रात उडी घेवून चपराश्याची आत्महत्या
पवनी(भंडारा) - एका विद्यालयात चपराशी पदावर कार्यरत तरुणाने येथील पुलावरुन वैनगंगा नदीपात्रात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
संदेश वासुदेव खाेब्रागडे (३४) रा. शुक्रवारी वाॅर्ड पवनी असे मृताचे नाव आहे. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ताे वैनगंगा नदीच्या पुलावर आला. काही कळायचा आत नदीपात्रात उडी घेतली. शोध घेतला असता दोन तासानंतर त्याचा मृतदेहच आढळला. ताे तालुक्यातील गाेसेबुज येथील विनाेद विद्यालयात चपराशी पदावर कार्यरत हाेता. बुधवारी सकाळी शाळेत जात असल्याचे सांगून ताे निघून गेला हाेता. नगरसेवक सुधीर खाेब्रागडे यांचा ताे भाऊ हाेता. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.