लोकांनी विचित्र अवस्थेत प्रियकर अन् प्रेयसीला पकडलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 09:22 PM2020-06-04T21:22:33+5:302020-06-04T21:23:39+5:30
गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्या युवकाला लघवी पिण्यास जबरदस्ती केली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिहारमधील मोतिहारीच्या पिपराकोठी येथून एक खळबळजनक घटना समोर आली असून, एका युवकाला विवाहित महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध ठेवणे महागात पडले आहे. गावकऱ्यांनी त्याला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. नंतर गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्या युवकाला लघवी पिण्यास जबरदस्ती केली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पिपराकोठी येथील ढेकहां बाला टोला गावात एका महिलेला भेटायला आलेल्या युवकाला पकडल्यानंतर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचायतमध्ये हल्ला करून दगडफेक केली. यावेळी काही लोकांवर गोळीबार केल्याचेही वृत्त आहे.
खळबळजनक!भरदिवसा बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
Kerala Elephant Death : आरोपींची धरपकड सुरु, एका संशयित व्यक्तीची केली चौकशी
या घटनेची माहिती मिळताच निरीक्षक आनंद कुमार यांच्या नेतृत्वाखाली तीन पोलिस ठाण्यांच्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. पोलिसांनी गोळीबार प्रकरणास नकार दिला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या घटनेबाबत युवकाकडील लोक व दुसऱ्या बाजूच्या लोकांत संघर्ष झाला व दगडफेक सुरू झाली, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
पोलीस निरीक्षक आनंद कुमार म्हणतात की, एका युवकाचे खेड्यातीलच एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. ती स्त्री विवाहित होती, तिचा नवरा बाहेर काम करत होता. गावकऱ्यांनी महिला आणि तिच्या प्रियकरास आक्षेपार्ह स्थितीत पकडले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्या तरूणाला आर्थिक आणि शारीरिक शिक्षा दिली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे वृत्त आहे. आम्ही सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहोत.
यामुळे संतापलेल्या युवकाच्या बाजूने असलेल्या लोकांनी तीव्र विरोध दर्शविला, त्यामुळे दोन्ही पक्षांत भांडणे सुरू झाली आणि जोरदार दगडफेकही झाली. या वेळी कुणीही तीन-चार राउंड फायर केले. माहिती मिळताच पोलीस पिपराकोठी पोलिस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोचले. परिस्थिती तणावपूर्ण असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात तीन पोलिस ठाण्यांचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरण नियंत्रणात आणले.