खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 05:02 PM2024-05-21T17:02:52+5:302024-05-21T17:04:00+5:30
एका पोलीस ठाण्यात गेल्या 23 दिवसांत 14 हून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक खळबळजनक घटना आता समोर आली आहे. हैदराबादमधील एका पोलीस ठाण्यात गेल्या 23 दिवसांत 14 हून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. लोकांच्या बायका अचानक गायब होत असल्याचं म्हटलं आहे. पोलीस ठाण्यात सरासरी दर दीड दिवसाला बेपत्ता व्यक्तीची नोंद होणारी प्रत्येक घटना धक्कादायक आहे.
या सर्व तक्रारींवर स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून बेपत्ता महिला आणि इतर लोकांचा शोध सुरू केला आहे. सायबराबाद पोलीस स्टेशनमध्ये 17 एप्रिल 2024 ते 10 मे या कालावधीत बेपत्ता व्यक्तींच्या 14 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. हैद्राबादच्या सायबराबाद पोलिसांत दाखल झालेल्या बेपत्ता प्रकरणांविषयी जाणून घेऊया...
एका विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कट्टा अंजनेयुलु राव नावाच्या व्यक्तीने सायबराबाद पोलीस स्टेशनमध्ये आपली 27 वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी सांगितले होतं की, त्यांची मुलगी 4 मे 2024 रोजी रात्री 11.50 वाजता मलेशियाला रवाना होणार होती. रात्री तिने विमानाला उशीर झाल्याची माहिती दिली. पहाटे पाच वाजेपर्यंत वडील आणि मुलीमध्ये बोलणे झाले, त्यानंतर फोन बंद झाला. यानंतर ती ना मलेशियाला पोहोचली ना तिच्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध झाली.
18 एप्रिल 2024 रोजीही अशीच घटना घडली आहे. तारकानागा प्रामाणिक यांनी सायबराबाद पोलीस ठाण्यात सायंकाळी 6.15 वाजता पोहोचून पोलीस अधिकाऱ्यांकडे पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांची 22 वर्षीय पत्नी प्रिया फोनवर कोणाशी तरी बोलत होती. यावरून त्यांचे पत्नीशी भांडण झाले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून घरी पोहोचले तेव्हा त्यांची पत्नी घरातून बेपत्ता होती. त्यांनी पत्नीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती कुठेच सापडली नाही.
19 एप्रिल 2024 रोजीही ही असाच प्रकार घडला आहे. मुन्नी मौलाबी नावाच्या महिलेने सायबराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि सांगितलं की, तिचा पती शेख रफी दुबईहून आपल्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आला होता. लग्नानंतर, 15 एप्रिल 2024 रोजी ते हैदराबाद विमानतळावर जाण्यासाठी घरातून निघाले, तेथून ते सौदीला रवाना होणार होते. 16 एप्रिल रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांनी एका अज्ञात व्यक्तीच्या नंबरवरून मुलीला फोन केला पण त्यानंतर त्यांच्याबाबत काहीच माहिती नाही.