मुलगा झाला नाही म्हणून सासरच्यांकडून छळ; सुनेने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 07:09 PM2019-03-14T19:09:29+5:302019-03-14T19:13:52+5:30
मृत महिलेचं नाव सुरेखा देसले असं नाव आहे.
ठाणे - तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या २५ वर्षीय विवाहित महिलेने हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणार छळ आणि दोन्ही मुली झाल्यानंतर मुलगा झाला नाही म्हणून दिला जाणारा त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत महिलेचं नाव सुरेखा देसले असं नाव आहे.
सुरेखाचं मे २०१६ मध्ये शरद देसलेशी लग्न झालं होतं. शरद आणि सुरेखा सहापूर तालुक्यातील खानिवली गावात राहत होती. त्यानंतर सासरची मंडळी तिला हुंड्यासाठी त्रास देत होते. मात्र, तो त्रास सहन करून तिने २०१७ साली एका मुलीला आणि जानेवारी २०१९ मध्ये पुन्हा एका मुलीला जन्म दिला. मात्र दोन्ही मुली झाल्याने सासरच्या मंडळींनी तिला मुलगा न झाल्याने छळ करण्यास सुरुवात केली. या त्रासाला सुरेखा कंटाळली होती. नंतर गेल्या शनिवारी सुरेखाच्या सासरच्या मंडळींनी तिच्या आई - वडिलांना फोन करून बेपत्ता झाली असल्याची माहिती दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. मात्र, रात्रीच्या सुमारास सुरेखाचा मृतदेह गावातील एका विहिरीत तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी मृत महिलेच्या पती शरद देसलेसह सासरे, दीर आणि नणंद यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३०४ (ब), ३०६, ३२३, ४३८ (अ), ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप पोलिसांचा तपास सुरु असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.